लॉकडाऊनमुळे माझ्या डोक्यावर केस येतीलः अनुपम खेर

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 मार्च 2020

देशातील लॉकडाऊनमुळे बॉलिवूडमधील कलाकार घरातच असून, अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करताना दिसतात. अभिनेत अनुपम खेर यांनी सुद्धा एक पोस्ट व्हायरल केली आहे.

मुंबईः देशातील लॉकडाऊनमुळे बॉलिवूडमधील कलाकार घरातच असून, अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करताना दिसतात. अभिनेत अनुपम खेर यांनी सुद्धा एक पोस्ट व्हायरल केली आहे.

Video:नवऱ्याच्या वर्क फ्रॉम होमला वैतागली बायको...

अनुपम खेर यांनी इन्स्टाग्रामवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत. एक पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे, 'मला हे जाणवत आहे की, होम क्वारंटाईन आणि लॉकडाऊनच्या दरम्यान माझ्या डोक्यावरील केस परत येतील. जर असे झाले तर माझ्यावर कोणती हेअरस्टाइल सर्वांत चांगली दिसेल. तुम्हाला काय वाटतं? हसू नका. हा खूप गंभीर विषय आहे. तसे पाहायला गेले तर स्टाइलमध्ये सर्वच चांगले आहेत पण तरीही तुम्ही सुचवा.'

अनुपम यांनी या पोस्टसोबत अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत. त्यांच्या या पोस्टवर नेटिझन्स व्यक होत आहेत. एक व्हिडीओ कविता शेअर केली आहे, "ऐ मेरे बिछड़े बालों, फिर से उग आओ....तुम पे मैं कुरबान, जुल्म के पंजों में हूं, मैं भी अब गंजों में हूं, सिर हुआ वीरान. आंख और माथे पे कैसे, झट से गिर जाते थे तुम, जब बिखरते थे, अदाएं कितनी बिखराते थे तुम. सूना ये सिर कर गए, तुम तो कब के छड़ गए. रह गए दो कान...." दरम्यान, अनुपम खेर हे सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टीव असतात.

Video: मोदींचे भाषण सुरू असताना त्याने पकडले कान...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: quarantine fun anupam Kher feels his hair may start growing and shares pictures in different hairstyles