चांद्रसफारीवर आर. माधवन 

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

अभिनेता सुशांत सिंग राजपूत सध्या आगामी चित्रपट "चंदामामा दूर के'च्या तयारीत मग्न आहे. यात तो अंतराळवीराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसुद्धा मुख्य भूमिकेत आहे. या दोघांव्यतिरिक्त आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री या चित्रपटात होणार आहे. हा अभिनेता म्हणजे मॅडी ऊर्फ आर. माधवन. माधवन या सिनेमात पायलटचा रोल साकारणार आहे. ही माहिती स्वत: आर. माधवन व सुशांत सिंग राजपूतने ट्विटरवर दिलीय. आता हे तीन कलाकार एकत्र धमाल करताना दिसतील.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत सध्या आगामी चित्रपट "चंदामामा दूर के'च्या तयारीत मग्न आहे. यात तो अंतराळवीराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसुद्धा मुख्य भूमिकेत आहे. या दोघांव्यतिरिक्त आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री या चित्रपटात होणार आहे. हा अभिनेता म्हणजे मॅडी ऊर्फ आर. माधवन. माधवन या सिनेमात पायलटचा रोल साकारणार आहे. ही माहिती स्वत: आर. माधवन व सुशांत सिंग राजपूतने ट्विटरवर दिलीय. आता हे तीन कलाकार एकत्र धमाल करताना दिसतील. "चंदामामा दूर के' चित्रपट खूपच वेगळा आहे आणि असा चित्रपट बॉलीवूडमध्ये कोणीही पाहिला नसल्याचं सुशांतने कित्येक वेळा आपल्या मुलाखतीत सांगितलं आहे. या सिनेमातील नायिकांची नावं अद्याप समजलेली नाहीत. मात्र चित्रपटाचे शीर्षक खूपच आकर्षक आहे. हे तिन्ही तगडे अभिनेते चित्रपटात काय कमाल करतात, हे पाहणं औत्सुक्‍याचं ठरेल. 

Web Title: R Madhavan' In Chanda Mama Door Ke