esakal | धोनीच्या मुलीला धमकावणा-यास कडक शिक्षा मिळावी; आर माधवन याने केले टविट्
sakal

बोलून बातमी शोधा

R Madhavan demands strict punishment for a teen who threatened MS Dhoni

गेल्या काही दिवसांपासून एकजण धोनीच्या मुलीला धमकी देऊन घाबरवत असल्याचा प्रकार समोर आला होता. यावर माधवन म्हणाला, पोलिसांनी एक मोठी कामगिरी पार पाडली आहे.

धोनीच्या मुलीला धमकावणा-यास कडक शिक्षा मिळावी; आर माधवन याने केले टविट्

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या मुलीला धमकावणा-यास अखेर पोलिसांनी अटक केली आहे. आता त्याला कडक शिक्षा व्हावी अशा आशयाचे टविट् प्रसिध्द अभिनेता आर.माधवन याने केले आहे.  झिवा या धोनीच्या मुलीला एक जणाने ऑनलाईन धमकी देऊन घाबरविल्याचा प्रकार समोर आला आहे. धमकी देणा-याला पोलिसांनी पकडल्याने त्याबद्दल माधवनने पोलिसांचे आभार मानले आहे.

झिवाला त्रास देणा-या त्या आरोपीला पोलिसांनी कडक शासन करावे अशी मागणी माधवन याने केली आहे. अशाप्रकारच्या 'फेसलेस राक्षसांना' शिक्षा व्हायला हवी. गेल्या काही दिवसांपासून एकजण धोनीच्या मुलीला धमकी देऊन घाबरवत असल्याचा प्रकार समोर आला होता. यावर माधवन म्हणाला, पोलिसांनी एक मोठी कामगिरी पार पाडली आहे. वेळेवर त्या व्यक्तिला जेरबंद केल्याने कायद्याची भीती आणि आदर लोकांच्या मनात राहणार आहे. ऑनलाईनवर सतत सक्रिय राहून हीनकसपणाचे कृत्य करणा-यांना कडक शिक्षा मिळायला हवी.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मूलाला गुजरातमधून पकडण्यात आले. कच येथील एस पी सौरभ सिंग यांनी सांगितले, आरोपी अल्पवयीन मुलगा त्या भागात असणा-या एका गावातील आहे. झिवाला धमक्यांचे मेसेज येत असल्याची माहिती धोनीची पत्नी साक्षीने सोशल अकाऊंटवर काही दिवसांपूर्वी व्हायरल केली होती. 

आता कळलं जगासमोर अपमान केल्यावर कसं वाटतं? ; कंगनाचा याचिका दाखल करणा-यांवर पलटवार

loading image