R Madhavan पडला वादात; म्हणाला,'पंचांग पाहून इस्रोनं मंगळावर पाठवलेलं यान'

साऊथ आणि हिंदी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता आर.माधवन सध्या आपल्या 'रॉकेट्री नांबी इफेक्ट' या सिनेमामुळे भलताच चर्चेत आहे
R Madhavan
R MadhavanGoogle

साऊथ आणि हिंदी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता आर.माधवन(R Madhavan) सध्या आपल्या रॉकेटरी नांबी इफेक्ट(Rocketry-The Nambi Effect) या सिनेमामुळे भलताच चर्चेत आहे. या सिनेमाची चाहते देखील मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. माधवननं या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली आहे. तब्बल ७ वर्ष हा सिनेमा बनवण्यासाठी त्याला लागले आहेत. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या अभिनेता भलताच बिझी आहे. नुकतच या सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं आयोजित एका कार्यक्रमात त्यानं असं काही विधान केलं की सोशल मीडियावर सगळयांनीच त्याच्यावर निशाणा साधला आहे. आर. माधवननं इस्रो आणि त्याच्या मंगळ मिशन बाबतीत एक असा दावा केला आहे की ज्यामुळे लोक भडकले आहेत.(R Madhavan gets trolled for claiming ISRO used Hindu calendar for Mars mission at Rocketry promotions)

R Madhavan
रश्मिकाची निर्मात्याकडे अजब मागणी; म्हणाली होती,'माझ्या कुत्र्याला...'

आर माधवनचा सिनेमा 'रॉकेट्री- द नांबी इफेक्ट'च्या प्रदर्शनाला आता काहीच दिवस राहिले आहेत. त्यामुळे सध्या अभिनेता एकदम जोरात सिनेमाचं प्रदर्शन करीत आहे. एका प्रमोशनल कार्यक्रमा दरम्यान आर.माधवननं इस्रो आणि त्याच्या मंगळवारच्या मिशन संदर्भात एक वादग्रस्त विधान केलं आहे,ज्यावरनं वादळ उठलं आहे. त्यानं दावा केला आहे की पंचांग आणि हिंदू कॅलेंडरच्या सहाय्याने मुहूर्त पाहून इस्रोनं अंतराळात यान पाठवलं होतं.

आर. माधवनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते यामुळे संतापलेयत आणि इंटरनेटवर अभिनेत्याला खरी-खोटी सुनावत आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'विज्ञान प्रत्येकाला कळेलच असं नाही. विज्ञानाला समजून न घेणं ठीक आहे,पण जेव्हा याविषयी सविस्तर काही माहित नसतं त्यावेळी आपलं तोंड बंद ठेवणं हेच योग्य आहे'. 'व्हॉट्स अपवर अर्धवट मिळालेल्या माहितीच्या आधारे स्वःचं हसू कशाला करुन घ्यायचं'. आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'इतक्या आत्मविश्वासानं माधवन बोललाय की काही मिनिटातच त्यानं स्वतःचा अपमान करुन घेतला, ही खूप मोठी गोष्ट आहे'.

आर माधवनचा आगामी सिनेमा 'Rocketry: The Nambi Effect' पुढील महिन्यात १ तारखेला रिलीज होत आहे. हा सिनेमा नांबी नारायण यांच्या आयुष्यावर आधारित आहे. ते एक शास्त्रज्ञ होते. इस्रो मध्ये ते एरोनेटिकल इंजीनिअर होते. त्यांच्यावर हेरगिरी करण्याचा आरोप लावला गेला होता. आर.माधवन सिनेमात नांबी नारायण यांची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा तामिळ,तेलुगू,कन्नड,मल्याळम आणि इंग्रजी भाषेत रिलीज केला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com