रश्मिकाची निर्मात्याकडे अजब मागणी; म्हणाली होती,'माझ्या कुत्र्याला...' Rashmika Mandana | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rashmika Mandana

रश्मिकाची निर्मात्याकडे अजब मागणी; म्हणाली होती,'माझ्या कुत्र्याला...'

रश्मिका मंदाना(Rashmika Mandana)विषयी गेल्या काही दिवसांत बातम्या कानावर पडतायत की तिनं आपल्या पाळीव कुत्र्यासाठी(Pet Dog) निर्मात्याकडे विमानाच्या तिकीटाची मागणी केली आहे. आता रश्मिकानं या पसरलेल्या अफवेवर प्रतिक्रिया दिली आहे जी खूप मजेशीर आहे. रश्मिकानं पहिलं तर हे स्पष्ट केलं आहे की,'' तिनं असली कुठलीच मागणी निर्मात्याकडे केलेली नाही. त्यानंतर ती म्हणाली की माझ्याविषयीच्या या अफवेची बातमी वाचल्यावर मी इतकी हसले की माझा सबंध दिवस मस्त गेला''.(Rashmika demand a flight ticket for her pet dog?)

हेही वाचा: 'पठाण' मधील शाहरुखचा खतरनाक लूक समोर; रिलीजसाठी आजचा दिवसच का निवडला?

रश्मिकानं लिहिलंय,''सॉरी,पण यामुळे माझा दिवस मस्त गेला. मी माझं हसू कंट्रोल करू शकत नाही''. रश्मिका विषयीच्या त्या अफवे संदर्भातील बातमीत लिहिलं होतं की, तिचा कुत्रा तिच्याशिवाय राहू शकत नाही.

हेही वाचा: सारा अली खानवर सलमान नाराज,सिनेमातून काढण्याची दिली धमकी?

एका चाहत्यानं यासंदर्भात लिहिलं आहे की,'अशा कितीतरी बातम्या आम्हाला ऐकायला मिळतात'. त्यावर रश्मिकानं प्रतिक्रिया देताना लिहिलं आहे की,'खरचं,प्लीज मला अशा बातम्या पाठवत जा'.

हेही वाचा: 'कधीही न मरणारं फूल',जीव धोक्यात टाकून रणवीरचं दीपिकाला सरप्राइज गिफ्ट

काही दिवसांपूर्वीच रश्मिकानं 'गूड बाय' सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहे. सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्रीनं सिनेमातील आपल्या सहकलाकारांविषयी स्पेशल मेसेज लिहिला होता. फोटो शेअर करत रश्मिकानं लिहिलं होतं की,''आज माझ्या 'गूडबाय' टीमला बाय बोलताना कसंतरी वाटतंय. पण आज शूटिंग संपलं. या सिनेमासोबत माझ्या दोन वर्षाच्या आठवणी जोडल्या आहेत. आम्ही कोरोनाच्या दरम्यानच सिनेमाचं शूटिंग केलं आहे. आपण सर्व हा सिनेमा नक्की पहाल अशी माझी आशा आहे. हा खूप मजेदार सिनेमा आहे''.

हेही वाचा: 'शिंदेशाही' घराणं वर्ल्ड रेकॉर्डच्या यादीत; लोकसंगीतानं केला नवा विक्रम

अभिनेत्रीनं पुढं लिहिलं आहे की,''या सिनेमात मी ज्यांच्या-ज्यांच्यासोबत काम केलं आहे,ते सगळेच माझ्यासाठी स्पेशल आहेत. अमिताभ बच्चन तर बेस्ट आहेत. मला या सिनेमात आपल्या सोबत काम करायला मिळालं याचा खूप आनंद आहे. तुम्ही जगातले बेस्ट मॅन आहात. नीना गुप्ता तुम्ही तर सगळ्यात क्यूट आहात. आय मिस यू''.

Web Title: Rashmika Demand For Her Pet Dog To

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top