
रेड कार्पेटवर व्हाईट परी; उर्वशीच्या घायाळ करणाऱ्या अदा
नेहमी सर्वांना आपल्या हॉट आदाने घायळ करणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला हिनं कान्स रेड कार्पेटवर जणू चार चाँद लावले आहेत. उर्वशीने तिचा तमिळ डेब्यू फिल्म 'द लीजेंड' लाँच करण्यासाठी कान्स फेस्टीव्हलला हाजेरी लावली आहे. पण चर्चा बॉलीवूडच्या जगात चर्चा रंगली आहे ती म्हणजे ती लुकची.
हेही वाचा: Beast: 'असं कसं विमान उडवलं, लॉजिक कुठंय? एअरफोर्स पायलटचा आक्षेप
कान्स फेस्टिव्हल शुभारंभ दरम्यान टोनी वार्ड कॉटर द्वारा असेम्बल किए स्टनिंग वन शोल्डर व्हाइट गाउन परिधान करत उर्वशीने रेड कार्पेटवर हाजेरी लावली आहे. सध्या तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.
उर्वशीने आपल्या क्रिमसन रेड लिपस्टिक बोल्ड मेकअप केला करत आपल्या सौंदर्यात भर घातली होती. या खास लूकचे काही फोटो अभिनेत्रीने स्वतः आपल्या अधिकृत इंस्टा पेजवर पोस्ट केलं आहेत.
हेही वाचा: Cannes 2022: कान्समध्ये दीपिकाकडे साऱ्यांच्या नजरा, चाहते भारावले!
मिस दिवा युनिव्हर्स उर्वशी 2013 मध्ये चित्रपटात अॅक्टिव्ह आहे. तिनं सिंह साहब दि ग्रेट या चित्रपटात 37 वर्षाहून मोठे असणारे सनी देओलची पत्नीची भूमिका निभावर चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं. तिने आत्तापर्यंत, भाग जॉनी, ग्रेट ग्रँड मस्ती, हेट स्टोरी 4, आणि वर्जिन भानुप्रिया यांसारख्या चित्रपटांमध्ये तिनं काम केलं आहे.
उर्वशी रौतेला लवकरच 'ब्लॅक रोज' या चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे. उर्वशी रौतेला ही उत्तराखंडमधील हरिद्वारची रहिवासी असून तिचे वडील मोठे बिझनेसमन आहेत. तिने लहानपणापासूनच मॉडेलिंगला सुरुवात केली होती.
उर्वशीने 2009 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी 'मिस टीन इंडिया'चा किताब जिंकला होता. याशिवाय तिने 'मिस इंडिया प्रिन्सेस', 'मिस टुरिझम वर्ल्ड', 'मिस इंडिया सुपरमॉडेल' सारखे खिताब जिंकले आहेत.
Web Title: Cannes Film Festival Urvashi Rautela Red Carpet Debut Photos
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..