माझा रोलही महत्त्वाचा... 

वृत्तसंस्था
शनिवार, 4 मार्च 2017

बॉलीवूडचा ऍक्‍शन हिरो अक्षयकुमारच्या "जॉली एल.एल.बी.2' चित्रपटाला रसिकांची भरभरून दाद मिळाली. आता त्याचा आगामी चित्रपट "पॅडमॅन' खूपच चर्चेत आलाय. हा चित्रपट सर्वांच्या विरोधाचा सामना करत सर्वात स्वस्त सॅनिटरी पॅड्‌स बनवणाऱ्या कोईम्बतुरच्या अरुणाचलम मुरूगननाथन यांच्यापासून प्रेरित होऊन बनवला आहे. या चित्रपटाची निर्मिती अक्षयची पत्नी म्हणजेच ट्‌विंकल खन्ना करतेय. यात अक्षयसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री सोनम कपूर व राधिका आपटे दिसणार आहे. याबाबत बोलताना राधिका म्हणाली की, या चित्रपटात मी अक्ष कुमारच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. यातील माझी भूमिकाही महत्त्वाची आहे.

बॉलीवूडचा ऍक्‍शन हिरो अक्षयकुमारच्या "जॉली एल.एल.बी.2' चित्रपटाला रसिकांची भरभरून दाद मिळाली. आता त्याचा आगामी चित्रपट "पॅडमॅन' खूपच चर्चेत आलाय. हा चित्रपट सर्वांच्या विरोधाचा सामना करत सर्वात स्वस्त सॅनिटरी पॅड्‌स बनवणाऱ्या कोईम्बतुरच्या अरुणाचलम मुरूगननाथन यांच्यापासून प्रेरित होऊन बनवला आहे. या चित्रपटाची निर्मिती अक्षयची पत्नी म्हणजेच ट्‌विंकल खन्ना करतेय. यात अक्षयसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री सोनम कपूर व राधिका आपटे दिसणार आहे. याबाबत बोलताना राधिका म्हणाली की, या चित्रपटात मी अक्ष कुमारच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. यातील माझी भूमिकाही महत्त्वाची आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. 
यातील रोलच्या तयारीबाबत राधिकाने सांगितले की, यातील सर्व पात्रांना शुद्ध हिंदी बोलायचे आहे. त्यामुळे मी शुद्ध हिंदी बोलण्याचा व उच्चारांचा सराव करते आहे. 

Web Title: radhika apte my role very important : Radhika aapate