आपण यांना पाहिलंत का, या हॉट अभिनेत्रीची अवस्था पाहून डोळे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

radhika apte

आपण यांना पाहिलंत का, या हॉट अभिनेत्रीची अवस्था पाहून डोळे..

अभिनयासोबत स्वतःतील न्यूनगंड बाजूला सारून बोल्ड सिन देणारी आणि मराठीसह बॉलीवूड आणि हॉलिवूडलाही भुरळ घालणारी अशी एक अभिनेत्री आहे जिने बघताबघता मनोरंजन विश्वात स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं. तिच्या ग्रामीण भूमिका असो किंवा बॉलीवूड मधील हॉट लुक तिने प्रत्येक साच्यात स्वतःला चपखल बसवलं. तिच्या कपड्यांची, बोल्ड दिसण्याची कायमच चर्चा असते. हीच अभिनेत्री चक्क एखाद्या डाकू किंवा माळरानावर राबून बेजार आलेल्या महिलेसारखी झाली आहे. तिचा अवतारही वेगळाच दिसतो आहे.

हेही वाचा: the kashmir files: या चित्रपटाला सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा हे दुर्दैव : शरद पवार

आता इतक्या वर्णनानंतर ही अभिनेत्री कोण याचा अंदाज आलाच असेल. ती दुसरी तिसरी कुणी नसून दमदार अभिनय कौशल्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री राधिका आपटे Radhika Apte आहे. अनेकदा तिच्या भूमिकांमुळे आणि न्यूड सीन्समुळे ती चर्चेत राहिली आहे. आता तर राधिका एका वेगळ्याच अवतारात समोर आली आहे. तिला सहज ओळखणे कठीण असून तिने स्वतःच हा अवतार सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

हेही वाचा: the kashmir files: काल कौतुक आज टीका; पवारांच्या भूमिकेवर विवेक अग्निहोत्री..

या फोटोत राधिकाने खाकी कपडे परिधान केले आहेत. तेही अत्यंत मळकट अवस्थेत ती उभी आहे. तिचे केस कापलेले शिवाय एखाद्या वेड्यासारखे पिंजारलेले आहेत. गळ्यात रंगीत मंगळसूत्र, मानेवर गोंदण, कानात झुबे आणि डोळ्यात काजळ असा काहीसा अवतार तिने केला आहे. ती एखाद्या आदिवासी प्रांतात असावी असा काहींनी अंदाज वर्तवला आहे. तर काही जण तिला 'डाकू' विशेषण देऊन संबोधत आहेत. या फोटोवर कमेंटचा पाऊस पडत आहे.

पण हा फोटो आताचा नाही. राधिकाच्या जुन्या चित्रपटातील फोटो तिने शेअर केला आहे. २०१६ मध्ये रिलीज आलेल्या 'पार्च्ड ' या चित्रपटासाठी तिने असा लुक केला होता. गुजरातच्या ग्रामीण भागातील पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात तिने 'लज्जो' हे पात्र साकारले होते. लीना यादव दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता आदिल हुसैनसोबत Adil Hussain राधिकाने न्यूड सीन दिला होता. त्यावेळी या सीनची खूप चर्चा झाली होती. त्याच चित्रपटातील एक आठवण राधिकाने आज शेअर केली आहे.

Web Title: Radhika Apte New Look

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top