Radhika Apte On Nepotism: राधिका पहिल्यांदाच नेपोटिझमवर बोलली, मोठ्या स्टारचा मुलगा आहे ना मग...

राधिका ही नेहमी नवनवीन भूमिका, धाडसी प्रयोग आणि बोल्डनेससाठी तिच्या बोल्ड अभिनयासाठी ओळखली जाते.
Radhika Apte Takes A Dig At Star Kids
Radhika Apte Takes A Dig At Star KidsEsakal

Radhika Apte On Star Kids: अभिनेत्री राधिका आपटे हिची वेगळी ओळख सांगायची गरज नाही. तिने तिच्या अभिनय कौशल्यानं मनोरंजन विश्वात वेगळीच ओळख निर्माण केली आहे. राधिका आपटे कायमच चर्चेत असते. राधिका ही नेहमी नवनवीन भूमिका, धाडसी प्रयोग आणि तिच्या बोल्ड अभिनयासाठी ओळखली जाते.

अभिनेत्री राधिका आपटेचे अनेकदा तिच्या निःपक्षपाती मतांसाठी कौतुक केले जाते. कामांबरोबरच ती तिच्या वक्तव्यामुळे देखील चर्चेत असते. ती प्रचंड स्पष्टव्यक्ती आहे. ती कोणत्याही मुद्यावर तिचं स्पष्ट मत व्यक्त करत असते.

Radhika Apte Takes A Dig At Star Kids
Dream Girl 2 BO: रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर 'ड्रिम गर्ल 2' ने घेतली मोठी झेप! केली इतक्या कोटींची कमाई..

आता राधिकाने नुकतिच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने नेपोटिझमबद्दल आणि चित्रपट निर्मात्यांबद्दल काही स्पष्ट मत सांगितलं.

यावर राधिका म्हणाली की, ज्या अभिनेत्यांना चांगलं काम करायचं आहे, त्यांना सगळ्यात आधी व्यायाम करून शरीर तयार करावं लागतं. यानंतर, त्यांना चांगले कपडे घालण्यापासून ते पापाराझी कॅमेऱ्यात येण्यापर्यंत सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल."

Radhika Apte Takes A Dig At Star Kids
Pratyusha Banerjee Case: 'आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं...'प्रत्युषा बॅनर्जी प्रकरणात राहुलची याचिका कोर्टानं फेटाळली

पुढे ती म्हणते की, "मात्र स्टार किड्स कोणताही कोर्स किंवा कोचिंग करत नाहीत, कारण त्यांच्यासाठी ते महत्त्वाचे नसते. त्यांना वाटतं की आपण स्टार किड्स आहोत, आपल्याला सर्व काही येतं."

"तर दुसरीकडे तो स्टार किड आहे, तो अभिनय करणारचं. जर नसेल करता येत तर आपण करुन घेवू असं चित्रपट निर्मात्यांनाही वाटतं. मला निर्मात्यांचे हे दोन चेहरे पाहिल्यानंतर खुप राग येतो. एकीकडे तुम्ही म्हणता की तुम्ही अभिनय करवून घेणार हा विश्वास तुम्हाला असतो मात्र जेव्हा चित्रपट फ्लॉप होतो तेव्हा तुम्ही कलाकाराला दोषी ठरवतात."

Radhika Apte Takes A Dig At Star Kids
Sunny Deol: सनी देओलला होता 'हा' गंभीर आजार..त्यामुळे शाळेत शिक्षकांचा खुप मार खाल्ला...

वर्क फ्रंटवर बद्दल बोलायचं झालं तर, राधिकाने अनेक प्रकारच्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. राधिकाने आजवर 'बदलापूर', 'हंटर', 'पॅड मॅन', 'पारचड', 'लस्ट स्टोरीज', 'माझी' यासारखे अनेक दर्जेदार चित्रपट केले आहेत.

काही दिवसांपुर्वी ती अनुश्री मेहताच्या स्पाय कॉमेडी मिसेस अंडरकव्हरमध्ये दिसली होती. त्यानंतर ती मेड इन हेवनच्या दुसऱ्या सिझनमध्ये दिसली. आता ती मर्डर मिस्ट्री चित्रपटात दिसणार आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com