अभिनेत्री राधिका आपटेच्या 'या' सिनेमाला मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

radhika
radhika

मुंबई- अभिनेत्री राधिका आपटेचा दिग्दर्शक म्हणून असलेला पहिला सिनेमा द स्लीप वॉकर्सला या वर्षी ऑनलाईन आयोजित केल्या जाणा-या पाम स्प्रिंग इंटरनॅशनल शॉट फेस्टमध्ये द बेस्ट मिडनाईट शॉट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. अभिनेत्री राधिका आपटेने सोशल मिडियावर पोस्ट करुन याविषयीची माहिती दिली आहे. 

राधिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत लिहिलं आहे की, 'धन्यवाद, पीएस फिल्म फेस्ट. आम्ही पाम स्प्रिंग फेस्टमध्ये बेस्ट मिडनाईट शॉट हा पुरस्कार जिंकल्याने आनंदी आहोत. बेस्ट मिडनाईट नाईट अवार्ड जिंकलेल्या द स्लीपवॉकर्सचं अभिनंदन.'नुकत्याच एका मुलाखतीत राधिकाने सांगितलं होतं की, 'मी दिग्दर्शनाच्या प्रक्रियेचा खूप आनंद घेतला. मी खुश आहे. आशा करते की लोकांना हा सिनेमा लवकर पाहायला मिळेल. मला असं वाटतं की मी दिग्दर्शक म्हणून पुढे आणखी काम करेन.' 

शहाना गोस्वामी आणि गुलशन देवैया स्टारर या लघुपटाची कथा राधिकाने लिहिली असून दिग्दर्शनही तिनेच केलं आहे. हा सिनेमा झोपेत चालण्याच्या सवयीशी संबंधित आहे. राधिका तिच्या बोल्ड अंदाजामुळे चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. सोशल मिडियावर देखील तिच्या बोल्ड अंदाजामुळे ती अनेकदा चर्चेत असते.

अभिनयासोबतंच तिचं सौंदर्य आणि बोल्ड अंदाजावरुन चाहत्यांमध्ये अनेकदा चर्चा रंगते. बोल्डनेससोबतंच राधिकाला तिच्या उत्तम अभिनयामुळे देखील ओळखलं जातं. राधिकाला वेबसिरीजची क्वीन देखील म्हटलं जातं. अनेक वेबसिरीजमध्ये तिने बॉलीवूडच्या अभिनेत्रींनाही मागे टाकलं आहे.

राधिका सोशल मिडियावरुन तिच्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि खासगी गोष्टींचे अपडेट्स देत असते. लॉकडाऊनमध्ये राधिका तिच्या पतीसोबत घरीच वेळ घालवत आहे.  

radhika apte post thank you message as her first directorial ventre bags international award  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com