esakal | फक्त व्हिसा मिळवण्यासाठी केलं लग्न- राधिका आपटे
sakal

बोलून बातमी शोधा

Radhika Apte

फक्त व्हिसा मिळवण्यासाठी केलं लग्न- राधिका आपटे

sakal_logo
By
स्वाती वेमूल

चौकटीबाहेरील भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री राधिका आपटेच्या Radhika Apte लग्नाविषयी फारशी कोणाला माहिती नाही. राधिकाने २०१२ साली ब्रिटीश संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी Benedict Taylor लग्न केलं. विशेष म्हणजे विवाहसंस्थेवर माझा विश्वास नसून फक्त व्हिसा मिळवण्यासाठी लग्न केल्याचा खुलासा राधिकाने नंतर एका मुलाखतीत केला. राधिका सध्या लंडनमध्ये पतीसोबत राहत असून शूटिंगनिमित्त भारतात वेळोवेळी येते.

लग्नाविषयी काय म्हणाली राधिका?

"माझा विवाहसंस्थेवर फारसा विश्वास नाही. माझं लग्न करण्यामागचं खरं कारण म्हणजे मला व्हिसा पाहिजे होता. त्यावेळी मला व्हिसा मिळवण्यासाठी फार अडचणींचा सामना करावा लागला होता. आम्हा दोघांनाही एकत्र राहायचं होतं. एकत्र राहण्यासाठी शेवटी आम्ही लग्नाचा निर्णय घेतला", असं ती म्हणाली. राधिका 'रात अकेली है' या नेटफ्लिक्सच्या चित्रपटात दिसली होती. यामध्ये तिने नवाजुद्दीनसोबत भूमिका साकारली होती. लॉकडाउनदरम्यान राधिका लंडनमध्येच होती.

हेही वाचा: 'मला एकट्यात लांब कुठेतरी दफन करा'; सिद्धार्थच्या अंत्यविधीनंतर करण पटेलची पोस्ट

न्यूड व्हिडीओमुळे होती चर्चेत

'क्लीन शेवन' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राधिकाची न्यूड क्लिप व्हायरल झाली होती. त्यावेळी राधिकाला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. "चार दिवस मी माझ्या घराबाहेर जाऊ शकत नव्हते. मीडिया काय म्हणतेय याची मला भीती नव्हती. पण माझे ड्राइव्हर, वॉचमन आणि माझ्या स्टायलिस्टचाही ड्राइव्हर मला त्या फोटोंमधून ओळखला होता. जे वादग्रस्त फोटो होते, ते नीट पाहिले असता कोणीही सांगू शकले असते की ती मी नाही. पण कदाचित त्याबाबत कोणीच काही करू शकत नव्हते, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे हाच पर्याय योग्य होता. काहीही करणं म्हणजे वेळ वाया घालवणं होतं", असं राधिका 'ग्रेझिया' या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती.

loading image
go to top