राधिका लंडनमध्येही भाजी महाग झाली का? राधिकाला चाहत्यांचा अजब सवाल...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

आता चक्क लंडनच्या रस्त्यावर बसलेला एक फोटो तिने शेअर केला आहे. आणि ती फक्त रस्त्यावर बसलेली नाही तर तिच्या बाजुला कलिंगडचा एक कापलेला तुकडा देखील आहे. आणि हातात तिच्या भाजीने भरलेली पिशवी आहे.

मुंबई ः सेलिब्रेटी मंडळींनी सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओज्, पोस्ट शेअर केल्या की त्याला लाखोनी व्ह्युज मिळतात. ह्या लॉकडाऊनमध्ये तर काय सोशल मीडियावर सेलिब्रेटींचे नवनवीन ट्रेण्ड सुरु झाले आहेत. लॉकडाऊनमध्ये आपण घरी काय करतो याची पूर्ण माहिती खरं तर माहिती कशाला दिनक्रमच म्हणा ना, ते चाहत्यांपर्यंत पोहचवत आहेत. काही कलाकारांनी घरात राहूनच लॉकडाऊन विशेष सीरिजही सुरु केली. ही सारी धडपड कशासाठी तर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी. कलाकार इथवरच थांबले नाहीत. घरात चक्क वेगवेगळे ड्रेस परिधान करुन फोटोशूटही करणं या मंडळींनी सुरु केलं. 

हे ही वाचा - मुंबईमधील 'या' स्टुडिओचे होणार क्वारंटाईन सेंटरमध्ये रुपांतर

ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. आपली विदेशी बहु प्रियांका चोप्राने तर साडी नेसूनच फोटो शूट केलं. असो...विविध फोटो पोस्ट करुन साऱ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यात ही मंडळी माहिर असतातच. आता असंच काहीसं केलंय ते अभिनेत्री राधिका आपटेने. राधिका तिच्या दमदार अभिनयामुळे तसेच तिच्या विविध भूमिकांमुळे चर्चेत असतेच. पण त्याचबरोबरीने तिचे बोल्ड फोटो नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#cosmoindia #midstofwork #mindiselsewhere #londonstreets #summer #rawimages @keirlaird

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

सध्या एक वेगळा आणि हटके फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. आणि नेहमीप्रमाणेच तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. तर झालं असं की सध्या राधिका आपल्या पतीबरोबर लंडनमध्ये राहत आहे. तिथे ती नेमकं काय करते हे विविध फोटोज्, व्हिडिओ शेअर करुन ती सांगतच असते. पण आता चक्क लंडनच्या रस्त्यावर बसलेला एक फोटो तिने शेअर केला आहे. आणि ती फक्त रस्त्यावर बसलेली नाही तर तिच्या बाजुला कलिंगडचा एक कापलेला तुकडा देखील आहे.

आणि हातात तिच्या भाजीने भरलेली पिशवी आहे. त्या पिशवीमधून कोथिंबर बाहेर आलेली दिसते. तिचा हा हटके फोटो पाहून नेहमीप्रमाणेच कमेंट्स करायला नेटकऱ्यांनी सुरुवात केली. अन् काहींनी तर हास्यास्पद कमेंट्स केल्या. एका युजर्सने राधिका लंडनमध्येही भाजी महाग झाली का? असा प्रश्न विचारला. तर काहीजण चक्क तिला भाज्यांचे भाव विचारत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असताना असं रस्त्यावर बसून फोटो काढण्याचं राधिकाचं काय बरं कारण असेल हे अद्यापही माहित नाही. पण नेहमीच चर्चेत राहण्यासाठी राधिकाने काढलेला हा फोटो मात्र सोशल मीडियावर सध्या चांगलाच गाजत आहे. 

radhika apte sitting on the streets of london


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: radhika apte sitting on the streets of london