esakal | विमानसेवा सुरु झाली अन् राधिकाने सोडला सुटकेचा निश्वास...
sakal

बोलून बातमी शोधा

radhika

सरकारने 25 मे पासून देशांतर्गत विमानसेवा सुरू केली आहे. यादरम्यान बरेच लोक जे आपल्याला घरी लॉकडाऊनमुळे पोहचू शकले नव्हते ते त्याचा घरी जायला निघाले आहेत.

विमानसेवा सुरु झाली अन् राधिकाने सोडला सुटकेचा निश्वास...

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : कोरोना विषाणू वाढत्या प्रादुर्भावाने देशभरात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांपासून देशभरातील सर्व रेल्वेसेवा आणि विमानसेवा बंद होत्या. अशातच सरकारने 25 मे पासून देशांतर्गत विमानसेवा सुरू केली आहे. यादरम्यान बरेच लोक जे आपल्याला घरी लॉकडाऊनमुळे पोहचू शकले नव्हते ते त्याचा घरी जायला निघाले आहेत. अशातच अभिनेत्री राधिका मदनही दिल्लीच्या तिच्या राहत्या घरी पोहचली आहे. एअरपोर्टवर असतानाचा एक फोटो राधिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत याची माहिती दिली आहे. 

मोठी बातमी ः सोनू सूदपाठोपाठ 'बिग बी' यांनीही पुढे केला परप्रांतीयांसाठी मदतीचा हात

25 मे पासून सरकारने देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याचा आदेश दिला. ही विमानसेवा सुरू झाल्यावर लगेच राधिका मदनने मुंबई ते दिल्ली असा प्रवास करत  तिच्या घरी दिल्लीला गेली आहे. राधिका बऱ्याच काळापासून मुंबईत राहत आहे. मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत आणि यापासून वाचण्यासाठी अनेक लोक त्यांच्या घरी जात आहेत. राधिकाही यापासून वाचण्यासाठी तिच्या घरी गेली आहे. राधिकाने एअरपोर्टवर असतानाचा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा सलवार पायजमा घातला असून चेहऱ्यावर मास्क आणि फेस शिल्ड लावली आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले आहे की, 'आई मी आपल्या घरी येते आहे.' तिच्या चेहऱ्यावर जरी मास्क असला तरीही घरी पोहचण्याचा आनंद तिच्या डोळ्यातून दिसून येत आहे. 

मोठी बातमी ः चुलबुल पांडेचा नवा अंदाज; दबंग येतोय आता नव्या रुपात...

राधिका तिच्या कामानिमित्त बऱ्याच वर्षांपासून मुंबईत राहत आहे. तिचं संपूर्ण कुटुंब हे दिल्लीत राहत. लॉकडाऊन असल्याने तीच काम देखील बंद आहे आणि ती मुंबईत अडकली होती. पण जस सरकारने देशांतर्गत विमानसेवेला परवानगी दिली तस लगेचच राधिका दिल्लीला जाण्यासाठी निघाली. आणि सुखरूप तिच्या घरी पोहचली आहे.