esakal | रघुबीर यादव यांच्यावर पत्नीचे आरोप; "दागिने गहाण ठेवून भागवतेय खर्च"
sakal

बोलून बातमी शोधा

raghubir yadav

रघुबीर यादव यांच्यावर पत्नीचे आरोप; "दागिने गहाण ठेवून भागवतेय खर्च"

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेते रघुबीर यादव Raghubir Yadav यांच्यावर पत्नी पूर्णिमा खर्गे Purnima Kharage यांनी पोटगी देत नसल्याचा आरोप केला आहे. रघुबीर आणि पूर्णिमा हे १९९५ सालापासून वेगळे राहत आहेत. पोटगीच्या या आरोपांवर अद्याप रघुबीर यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूर्णिमा यांनी पोटगीसंदर्भात त्यांची व्यथा मांडली. (Raghubir Yadavs wife Purnima says he has not been paying alimony slv92)

"गेल्या वर्षी, पाच महिने मला पोटगी मिळालीच नव्हती. घराचं भाडं भरण्यासाठीही माझ्याकडे पैसे नव्हते. माझ्याकडे जे काही दागिने होते, ते मला गहाण ठेवावे लागले. यावर्षीसुद्धा चार महिने मला पोटगीची रक्कम मिळाली नाही. कोर्टाच्या तारखेच्या दोन महिन्यांपूर्वी मला ८० हजार रुपये देण्यात आले होते. मात्र ही रक्कम फक्त दोन महिन्यांचीच होती." दुसरीकडे पूर्णिमा या अतिरिक्त रक्कम मागत असल्याने पोटगी प्रकरण इतके वर्षे लांबलं जात असल्याचं रघुबीर यादव यांची वकील शालिनी देवी यांनी स्पष्ट केलं. "रघुबीर हे ७१ वर्षांचे आहेत आणि पूर्णिमा यांनी ही गोष्ट समजून घ्यावी", असं त्या म्हणाल्या.

हेही वाचा: 'माझा होशील ना'मध्ये नवीन ट्विस्ट; आदित्य देसाई विरुद्ध आदित्य देसाईचा सामना

१५ वर्षे वेगळे राहिल्यानंतर पूर्णिमा यांनी गेल्या वर्षी घटस्फोटाची याचिका दाखल केली. पूर्णिमा यांनी रघुबीर यांच्यावर विवाहबाह्य संबंधाचा आरोप केला होता. पूर्णिमा आणि रघुबीर यांना ३० वर्षांचा मुलगा आहे. १९८८ साली या दोघांनी लग्न केलं आणि १९९५ सालापासून हे दोघं वेगवेगळे राहत आहेत. "रघुबीर हे इंडस्ट्रीत कामासाठी संघर्ष करत असताना त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी माझं कथ्थक डान्सरचं करिअर सोडलं. अभिनय क्षेत्रात यश मिळाल्यानंतर मात्र त्यांनी विवाहबाह्य संबंध ठेवून माझी फसवणूक केली", असे आरोप पूर्णिमा यांनी घटस्फोटाच्या अर्जात केले होते.

loading image