सनीच्या जागी रिया 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 जून 2017

सध्या एकता कपूरच्या अल्ट बालाजी या वेब चॅनेलची खूपच प्रशंसा होत आहे. या वेब चॅनेलवरील वेबसीरिज तरुणाईच्या पसंतीस उतरल्या आहेत. अनेक वेगवेगळे विषय घेऊन या वेबसीरिज आल्या आहेत.

फक्त लव्हस्टोरीज नाही; तर वेगवेगळ्या विषयांवर आधारित या वेबसीरिज आहेत. आता अल्ट बालाजी अशीच एक नवीन वेबसीरिज घेऊन येत आहे. सनी लिओनच्या "रागिणी एमएमएस' या चित्रपटावर आधारित ही वेबसीरिज असणार आहे. "रागिणी एमएमएस' आणि "रागिणी एमएमएस 2' या दोन्ही चित्रपटात सनीने आपली अदाकारी दाखवली होती.

पण या वेबसीरिजमध्ये सनीची जागा रिया सेनने घेतली आहे. "रागिणी एमएमएस 2.2' असे या वेबसीरिजचे नाव असणार आहे. रागिणी एमएमएस हा चित्रपट हॉरर आणि बोल्ड कंटेन्टसाठी खूप प्रसिद्ध होता. रागिणी एमएमएस 2.2 ची कहाणी एका विवाहित स्त्रीच्या अवतीभवती फिरणारी आहे. रिया सेनला तिच्या करियर दृष्टिकोनातून ही वेबसीरिज नक्कीच फायदेशीर ठरेल, असे वाटते. 
 
Web Title: Ragini MMS 2: Riya Sen to star in the web series version of the film?