चित्रिकरणादरम्यान अभिनेता राहुल देव जखमी

टीम ई सकाळ
मंगळवार, 11 जुलै 2017

रॉकी चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अभिनेता राहुल देव यांचा चित्रीकरणाच्या दरम्यान सेटवर अपघात झाला. सुर्वे फार्म येथे चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना, हाणामारीच्या एका प्रसंगात त्यांना ही दुखापत झाली आहे. चित्रपटाचा नायक संदीप साळवे यांच्यासोबत हाणामारीच्या प्रसंगाचे चित्रीकरण होत असताना हा अपघात झाला.

मुबई:  रॉकी चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अभिनेता राहुल देव यांचा चित्रीकरणाच्या दरम्यान सेटवर अपघात झाला. सुर्वे फार्म येथे चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना, हाणामारीच्या एका प्रसंगात त्यांना ही दुखापत झाली आहे. चित्रपटाचा नायक संदीप साळवे यांच्यासोबत हाणामारीच्या प्रसंगाचे चित्रीकरण होत असताना हा अपघात झाला.

या चित्रपटासाठी हाणामारीचे एक दृश्य राहुल देव व संदीप साळवे यांच्यावर चित्रित करायचे होते. यासाठी डमी न वापरता हा सीन राहुल देव यांनी स्वत: करण्याचे ठरवले. तो सीन करत असताना अचानक राहुल देव जमिनीवर ठेवण्यात आलेल्या ट्यूबलाईट सेटवर जाऊन आदळले आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली. यानंतर चित्रीकरण थांबविण्यात आले. झालेल्या दुखापतीची पर्वा न करता प्राथमिक उपचार घेऊन अभिनेता राहुल देव यांनी हा सीन यशस्वीरित्या पूर्ण केला. तेव्हा उपस्थित सर्वच टीमने राहुल देव यांच्या कामाप्रती असलेल्या बांधिलकीचे कौतुक केले.

Web Title: rahul dev injured esakal news