esakal | शुभमंगल सावधान! राहुल वैद्य-दिशा परमारचं धूमधडाक्यात लग्न
sakal

बोलून बातमी शोधा

rahul vaidya and disha parmar

शुभमंगल सावधान! राहुल वैद्य-दिशा परमारचं धूमधडाक्यात लग्न

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - ज्या प्रसंगाची चाहते गेल्या अनेक महिन्यांपासुन वाट पाहत होते तो क्षण अखेर आला. प्रख्यात गायक आणि बिग बॉसमधील (bigg boss season 14) स्पर्धक राहूल वैदयनं (rahul vaidya) त्याची मैत्रीण दिशा परमार (disha parmar) सोबत सात फेरे घेतले आहेत. त्याचे काही फोटो नुकतेच सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासुन त्यांच्या अफेयरची चर्चा होती. त्यांच्या लग्नाला निवडक पाहुणेच उपस्थित होते. कोरोनाच्या काळात प्रशासनानं सांगितलेल्या नियमांचे पालन करुन त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. (rahul vaidya disha parmar wedding inside pics leaks and gone viral yst88)

चाहत्यांनी राहुल आणि दिशाला शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बॉसमध्ये या दोघांच्या नात्याला सुरुवात झाली. त्या शो दरम्यान त्यांच्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. दोघांच्या घरच्यांना देखील ही गोष्ट माहिती होती. त्यांच्याकडूनही होकार आला होता. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लग्नाला मुहूर्त सापडत नव्हता. डिसेंबरच्या अखेरीस राहुल लग्न करणार असल्याची शक्यता होती. त्या अगोदरच त्यानं लग्न केल्यानं चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

टीव्ही मनोरंजन आणि बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी देखील त्याच्या लग्नाला शुभेच्छा दिल्या आहेत. यापूर्वी राहुलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात त्यानं ढोल ताशांच्या गजरात डान्स केला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. दुसरीकडे दिशानं त्याचं स्वागत केलं होतं. दिशानं वधूचा जो वेष धारण केला आहे त्यात ती कमालीची सुंदर दिसते आहे.

हेही वाचा: Bhonga Teaser: प्रार्थना महत्त्वाची की प्रार्थनेचा आवाज?

हेही वाचा: अरुंधती करणार तिचे शिक्षण पूर्ण

राहुलनं गोल्डन रंगाची पगडी घातली आहे. त्याच रंगाची शेरवानी देखील घातली आहे. मुंबईतील एका हॉटेलमध्ये या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. बिग बॉसच्या 14 व्या सीझनपासून राहुल आणि दिशा या दोघांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली होती. राहुलचा खास मित्र अली गोनीनं सोशल मीडियावर या लग्नाचे काही फोटो शेयर केले आहेत. त्या फोटोंना प्रेक्षकांनी दाद दिली आहे.

loading image