esakal | 'पाहूण्यांना स्पर्धकांचं कौतूक करावचं लागतं', राहूलनं सांगितलं कारण
sakal

बोलून बातमी शोधा

indian idol rahul vaidya

'पाहूण्यांना स्पर्धकांचं कौतूक करावचं लागतं', राहूलनं सांगितलं कारण

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - मनोरंजन (entertainment) क्षेत्रामध्ये अद्याप आपली लोकप्रियता कायम असणारा शो म्हणून इंडियन आयडॉलचं (indian idol) नाव घ्यावे लागेल. गेल्या बारा वर्षांपासून हा शो लोकप्रिय आहे. मात्र तो शो गेल्या काही महिन्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याचे कारण म्हणजे त्या शो मध्ये जे सेलिब्रेटी स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी येतात त्यांनीच आता शो विषयी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. त्या प्रतिक्रिया चाहत्यांसाठी धक्कादायक असल्याचे दिसुन आले. किशोर कुमार यांचे चिरंजीव अमित कुमार (amit kumar) यांनी केलेल्या एका खुलाशानंतर हा प्रकार समोर आला होता. (rahul vaidya said about controversy over indian idol 12 why guest made contestants)

इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वातील लोकप्रिय स्पर्धक म्हणून राहूल वैदय (rahul vaidya) परिचित आहे. तो गेल्या वर्षी बिग बॉस स्पर्धेत सहभागी झाला होता. त्यातही त्याची क्रेझ दिसून आली. तो या स्पर्धेच्या फायनलिस्टमध्ये होता. आता राहूलनं इंडियन आयडॉलविषयी प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यानं या मालिकेतील रियॅलिटी काय आहे याबद्दल सांगितले आहे. यापूर्वी इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वातील स्पर्धक अभिजित सावंतनं देखील शो बदद्ल प्रतिक्रिया दिली होती. त्याचीही चर्चा झाली होती.

राहुलनं सांगितलं आहे की, स्पर्धकांचे कौतूक करण्यासाठीच वेगवेगळ्या सेलिब्रेटींना बोलावले जाते. त्यानिमित्तानं शो चा टीआरपी वाढावा हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपल्या आवडत्या इंडियन आयडॉल मालिकेविषयी काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. तो म्हणाला, आता या मालिकेत काय होतं याविषयी फारसं काही सांगता येणार नाही. पण एक सांगावेसे वाटते ते म्हणजे शो मध्ये जो रोमँटिक अँगल दिला जातो त्याचे कारण केवळ मनोरंजन असेच असते.

हेही वाचा: 'ती चोर आहे' मृण्मयीचा बहिणीवर आरोप; पहा व्हिडीओ

हेही वाचा: घटस्फोटानंतर पुन्हा एकदा एकत्र दिसले आमिर-किरण

हा शो कसा आहे याबद्दल मला वेगळं काही सांगायचं नाही. प्रेक्षकांना अनेक गोष्टी माहिती असतात. या शो मध्ये ज्यावेळी काही सेलिब्रेटी येतात ते केवळ स्पर्धकांचे कौतूक करण्यासाठी येतात असा आरोप एका सेलिब्रेटीनं केला होता. हे मी ऐकले होते. यावर मला असं वाटतं की, या शो मधील सर्व गायक हे चांगले आहेत. त्यांच्यातील प्रतिभाही मोठी आहे. वास्तविक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी हा शो आहे. याचा विचार प्रेक्षकांनी करणे गरजेचा आहे. असंही राहुलनं यावेळी सांगितले.

loading image