esakal | 'ती चोर आहे' मृण्मयीचा बहिणीवर आरोप; पहा व्हिडीओ
sakal

बोलून बातमी शोधा

Mrunmayee Deshpande ,gautami Deshpande

'ती चोर आहे' मृण्मयीचा बहिणीवर आरोप; पहा व्हिडीओ

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

मराठी मालिका आणि चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सध्या मृण्मयी 'सा रे ग म प लिटिल चॅम्प' या शोचे सुत्रसंचालन करत आहे. मृण्मयीची बहिण गौतमी देशपांडे (gautami Deshpande) ही देखील अभिनेत्री आहे. ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेतून गौतमीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘माझा होशील ना’ या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेमध्ये गौतमी सईची भूमिका साकारते. नुकताच मृण्मयीने गौतमीवर आरोप करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये मृण्मयी 'ती चोर आहे' असं गौतमीला म्हणत आहे. (actress Mrunmayee Deshpande shares video and makes allegations against sister gautami)

मृण्मयी व्हिडीओमध्ये म्हणाली, 'मी आज एका मोठ्या बहिणीची व्यथा मांडतेय. मी आत्ता गौतमीच्या घरात असून तिचं कपाट लावतेय. मला सांगायला खूप आनंद होतोय की माझे हरवलेले सर्व कपडे मला मिळाले. त्या कपड्यांचे बोळे करून लपवण्यात आले होते. मी तिला विचारलंही होतं की माझे काही टॉप चुकून तुझ्याकडे आले आहेत का? यावर तिने 'नाही ताई' असं सरळ उत्तर दिलं. मात्र त्या कपाटात माझे सगळे कपडे लपवून ठेवण्यात आले होते.तुम्ही ज्या सईवर प्रेम करता ती सई चोर आहे.' हा व्हिडीओ शेअर करून मृण्मयीने त्याला कॅप्शन दिले, 'अजूनही सुधरली नाहीये ही!'

हेही वाचा: राधिका म्हणाली, 'घरी बसावं लागलं तरी चालेल पण सर्जरी करणार नाही'

मृण्मयीच्या या भन्नाट व्हिडीओवर अनेक कलाकरांनी कमेंट केल्या आहेत. तर गौतमीने 'खोटारडी... तू चोर' अशी कमेंट केली. या दोघींच्या नात्याला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

हेही वाचा: 6 years for Baahubali: 'या' कारणांमुळे सुपरहिट ठरला 'बाहुबली'

loading image