esakal | 'मला चांगली ट्रीटमेंट मिळाली नाही', मरण्यापूर्वी अभिनेत्याची पोस्ट व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Vohra

'मला चांगली ट्रीटमेंट मिळाली नाही', मरण्यापूर्वी अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनानं बॉलीवूडमध्ये शिरकाव केल्यापासून त्याची मोठी दहशत आता पसरण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा फटका अनेक सेलिब्रेटींना बसला आहे. काही दिवसांपासून कोरोनाचा वाढता कहर डोकेदुखीचा विषय ठरताना दिसत आहे. त्याचा परिणाम असा की, अनेक सेलिब्रेटींना यामुळे जीव गमवावा लागला आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार अभिनेता राहुल वोहरा (Rahul Vohra) यांनी मदतीसाठी काल फेसबूकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी लोकांना आवाहन केले होते. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर त्यांचा कोरोनानं मृत्यु झाला आहे.

ज्यावेळी राहुल (Rahul Vohra) यांनी फेसबूकवर पोस्ट लिहिली तेव्हापासून त्यांच्या तब्येत खालावत चालली होती. नेटफ्लिक्सवरील Unfreedom या चित्रपटात राहुल यांची भूमिका होती. ब-याच काळापासून त्यांची कोरोना सोबत चाललेली लढाई अखेर संपुष्टात आली आहे. त्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यांच्या निधनाची बातमी थिएटर दिग्दर्शक आणि लेखक अरविंद गौर (Arvind Gaur) यांनी सोशल मीडियावर दिली आहे.

Rahul vohra news

Rahul vohra news

Arvind Gaur

Arvind Gaur

मला काही करुन मदत करा. मला तुमच्याकडून मदतीची गरज आहे. अशा आशयाची पोस्ट राहुल (Rahul Vohra) यांनी सोशल मीडियावर लिहिली होती. ज्यावेळी त्यांना कोरोना झाल्याचे कळले तेव्हापासून त्यांच्या तब्येतीत बिघाड होऊ लागला. तेव्हा त्यांनी चाहत्यांकडे मदतीची याचना केली होती. राहुल यांनी आपल्या फेसबुक वॉलवर लिहिले आहे, मला जर चांगली ट्रीटमेंट मिळाली असती तर मी वाचलो असतो. तुम्हा सर्वांचा राहुल वोरा. एक पेशंट म्हणून त्यांनी काही डिटेल्सही यावेळी सोशल मीडियावर शेअर केले होते.

हेही वाचा: 'चाळीस वर्ष दिली साथ, कोरोनानं शेवटी घात केलाच'

हेही वाचा: उधाराची साडी, रबर बँडची अंगठी; १५० रुपयांत पार पडलं अभिनेत्याचं लग्न

मी आता हार मानली आहे. पुन्हा नव्यानं जन्म घेईल. आणि चांगले काम करेल. याप्रसंगी अरविंद गौर यांनी राहुल (Rahul Vohra) यांच्या जाण्यावर शोक व्यक्त केला असून त्याला श्रध्दांजलीही वाहिली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, राहुल आता राहिला नाही. त्याच्यासारखा सर्वोत्तम अभिनेता गमावणं माझ्यासाठी वेदनादायी आहे. त्याचा जीव वाचला असता जर त्याला चांगली ट्रीटमेंट मिळाली असती.