Raid 2: अजय देवगणच्या 'रेड 2' मध्ये हा मराठमोळा अभिनेता साकरणार खलनायक, फोटो व्हायरल

अजय देवगणच्या आगामी रेड 2 मध्ये खलनायक कोण साकारणार? याची घोषणा झालीय
raid 2 Riteish Deshmukh takes on the role of an antagonist in Ajay Devgn and Vaani Kapoor starrer
raid 2 Riteish Deshmukh takes on the role of an antagonist in Ajay Devgn and Vaani Kapoor starrer SAKAL

Raid 2 News: अभिनेता अजय देवगण आगामी 'रेड 2' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. काहीच दिवसांपुर्वी रेड 2 ची घोषणा झाली. साऊथ सुपरस्टार रवी तेजाने रेड 2 च्या शुटींगच्या मुहुर्ताचा क्लॅप दिला.

आता रेड 2 बद्दल एक महत्वाची गोष्ट समोर आलीय. या सिनेमात एक मराठमोळा कलाकार खलनायक साकारणार आहे. कोण आहे तो? पुढे वाचायला मिळेल.

raid 2 Riteish Deshmukh takes on the role of an antagonist in Ajay Devgn and Vaani Kapoor starrer
Merry Christmas Review: कसा आहे कतरिना - सेतुपतीचा मेरी ख्रिसमस? वाचा रिव्ह्यू

हा मराठमोळा अभिनेता रेड 2 मध्ये खलनायक

रेड 2 मध्ये अभिनेता रितेश देशमुख खलनायकाची भूमिका साकारणार आहे. याआधी 'एक व्हिलन' सिनेमात रितेशने निगेटिव्ह लीड करत सर्वांना त्याची दखल घ्यायला भाग पाडलं.

आता रितेश पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यावेळी तो अजय देवगणच्या आमनेसामने उभा राहणार आहे.

गेल्या आठवड्यात रेड 2 या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत सुरू झाले असून मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये त्याचे मोठ्या प्रमाणावर चित्रीकरण होणार आहे.

रेड 2 ची घोषणा

IRS अमय पटनायक उर्फ अजय देवगणला एक नवीन टीप मिळाली! यावेळी कोणाच्या घरावर छापा टाकणार हे जाणून घ्यायला सर्वजण उत्सुक असतील.

2018 च्या ब्लॉकबस्टर रेड च्या जबरदस्त यशानंतर, अजय देवगण दिग्दर्शक राजकुमार गुप्ता आणि निर्माते भूषण कुमार, अभिषेक पाठक आणि कृष्ण कुमार पुन्हा एकत्र आलेत.

रेड 2 साठी ही सर्व टीम एकत्र आली आहेत. यानिमित्ताने इन्कम टॅक्स विभागाच्या अनसन्ग हिरोंचा गौरव होणार आहे.

या तारखेला रिलीज होणार रेड 2

रेड 2 पुन्हा एकदा सत्य घटनेवर आधारित एक गोष्ट प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहे.पहिल्या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली. आणि आता रेड 2 च्या निमित्ताने दुहेरी ड्रामा आणि सस्पेन्ससहची गंमत प्रेक्षकांना बघायला मिळणार यात शंका नाही.

रेड 2 ची निर्मिती भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि कृष्ण कुमार यांनी त्यांच्या T-Series आणि Panorama Studios या बॅनरखाली होत आहे. हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com