Raj Kapoor Poster : 'मेरा नाम जोकर' च्या 'त्या' पोस्टरचा लिलाव, कमाईच्या बाबत केलं 'वर्ल्ड रेकॉर्ड'!

राज कपूर यांचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगभर आहेत. त्यांच्या चित्रपटांनी केलेल्या कमाईचे आकडेही मोठे आहेत.
Raj Kapoor Poster
Raj Kapoor Poster esakal

Mera Naam Joker Ukrainian Poster : बॉलीवूडमध्ये शो मॅन म्हणून ज्यांची अमाप लोकप्रियता आहे. ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात राज कपूर यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळवली होती. ज्यांना त्या नावानं प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले त्या राज कपूर यांच्याबाबत एक बातमी समोर आली आहे.

राज कपूर यांचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगभर आहेत. त्यांच्या चित्रपटांनी केलेल्या कमाईचे आकडेही मोठे आहेत. त्याला मिळालेला प्रतिसाद प्रचंड आहे. अशा राज कपूर यांच्या चाहत्यांच्या निरपेक्ष प्रेमाचे एक उदाहरण दिसून आले आहे. राज कपूर @100 च्या निमित्तानं राज कपूर यांच्या मेरा नाम जोकरमधील त्या पोस्टरचा लिलाव करण्यात आला आहे. ती बातमी आता चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

१९६० मध्ये आलेल्या मेरा नाम जोकरच्या चित्रपटानं त्यावेळी मोठी लोकप्रियता मिळवली होती. त्याला चाहत्यांचा, प्रेक्षकांचा प्रतिसादही मिळाला होता. त्या चित्रपटातील बनवारा नावाचे पोस्टर आता लिलावात विकले गेले आहे. त्याला पाच लाख रुपयांची बोली लागली होती. आणि मेरा नाम जोकरचे युक्रेनी पोस्टर १.५ लाख रुपयांनी विकले गेले आहे.

भलेही राज कपूर हे आज आपल्यात नसले तरी त्यांच्या कित्येक आठवणी या पोस्टरच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात कायम आहेत. त्या पोस्टरच्या कमाईच्याबाबत बिग बी अमिताभ यांना देखील राज कपूर यांनी मागे टाकले आहे. राज कपूर यांच्या चित्रपटांच्या पोस्टरला सर्वाधिक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. इ टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट इतिहासकार एसएमएम असुजा यांनी सांगितले की, पोस्टर दिसायला खूपच सुंदर होते. ते खूप दुर्मिळही होते.

Raj Kapoor Poster
Rashmika Mandanna : नॅशनल क्रश रश्मिकानं केला आजारपणाचा मोठा खुलासा, 'त्या' दुखण्यानं केलं हैराण!

मेरा नाम जोकरची गोष्टच वेगळी होती. त्याला मिळालेला प्रतिसादही तुफान होता. त्यामुळे त्याच्याविषयीच्या अनेक आठवणी चाहत्यांच्या मनात कायम आहे. हे कारण आहे की, त्या तिकीट कलेक्शनला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

मेरा नाम जोकरच्या त्या पोस्टरच्या लिलावाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यानं नवं वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. राज कपूर यांची १०० वी बर्थ अॅनिव्हर्सरी सुरु होत आहे. अशावेळी त्यांना रशियातील चाहत्यांकडून मोठी आदरांजली वाहिली जात आहे. त्यांच्या आवारा नावाच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com