Urfi Javed-Raj Kundra Video: शक्तीमान ही गंगाधर! आधी टीका अन् आता हातमिळवणी,उर्फी अन् राज कुंद्रा एकाच व्हिडिओत

Urfi Javed Raj Kundra Patchup Video:
Urfi Javed Raj Kundra Patchup Video:Esakal

Urfi Javed Raj Kundra Patchup Video: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सध्या सोशल मीडियावर अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियपासून ब्रेक घेतलेल्या राजनं पुन्हा कमबॅक केलं आणि त्यानंतर राज कुंद्राचीच सर्वत्र चर्चा रंगली.

त्यातच त्याने कमबॅक करताच अभिनेत्री उर्फी जावेदसोबत पंगा घेतला. उर्फी जावेद आणि राज कुंद्रा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून भांडण सुरू आहे.

सुरुवातीला उर्फीनं राज कुंद्राचं कौतुक केलं होत मात्र राजने एका स्टँड अपमध्ये उर्फीची खिल्ली उडवली. मग काय त्यानंतर उर्फीने त्याला पॉर्न किंग म्हणत सगळ्यासमोर ट्रोल केलं.

त्यानंतर आता उर्फी आणि राज हे कट्टर शत्रू झाले असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या होत्या. राजने उगाच उर्फी जावेदसोबत पंगा घेतल्याच नेटकरी बोलू लागले.

आता त्यातच उर्फी आणि राज कुंद्रा हे एकाच व्हिडिओमध्ये दिसले. त्यामुळे उर्फी जावेद आणि राज कुंद्राचे पॅचअप झाले आहे. अशी चर्चा सुरु झाली आहे.

Urfi Javed Raj Kundra Patchup Video:
Shantit Kranti 2 Review: जगण्याचा आनंद घेऊन 'शांतीत क्रांती' करायला लावणारी अनोखी कहाणी

उर्फी जावेदने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केला आहे ज्यात ती राज कुंद्रासोबत दिसत आहे. दोघांनी आता एकत्र येऊन एक व्हिडिओ तयार केला आहे.

उर्फी आणि राज या दोघांनी मिळून भोला चित्रपटातील 'नजर लग जायेगी' या गाण्यावर व्हिडीओ तयार केला आहे. तर व्हिडीओच्या शेवटी उर्फीने राजच्या चेहऱ्यावरचा मास्कही काढला आहे. तर राज देखील तिच्यासमोर हात जोडताना दिसत आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांना त्याच्या डोळ्यावर विश्वात बसत नाही आहे.

Urfi Javed Raj Kundra Patchup Video:
Aspirants 3 Season : 'अँस्पिरंट्स' च्या नवीन सीझनची घोषणा, संदीप भैय्या सांगणार यशाचा फॉर्म्युला?

'हा फक्त एक ट्रेलर आहे...' असं कॅप्शन उर्फीनं या व्हिडिओला दिले आहे. 'मास्क मॅन आणि मास्क बाई व्वा , 'काम अशा पद्धतीने करा की 4 लोकांना तोंड दाखवण्याची इच्छा होणार नाही', ‘दोघेही पागल झाले आहेत.’ अशा अनेक कमेंट त्याच्या व्हिडिओ येत आहे. तर हे दोघेही एकत्र चित्रपट तयार करणार आहेत का अशीही चर्चा सुरु झाली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com