esakal | पतीच्या अटकेनंतर शूटिंगला शिल्पा गैरहजर; 'ही' अभिनेत्री घेणार जागा
sakal

बोलून बातमी शोधा

पतीच्या अटकेनंतर शूटिंगला शिल्पा गैरहजर; 'ही' अभिनेत्री घेणार जागा

पतीच्या अटकेनंतर शूटिंगला शिल्पा गैरहजर; 'ही' अभिनेत्री घेणार जागा

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा Shilpa Shetty पती राज कुंद्राला Raj Kundra अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी सोमवारी रात्री अटक झाली. पतीच्या अटकेनंतर 'सुपर डान्सर-4' या शोच्या आगामी एपिसोडच्या शूटिंगला शिल्पा गैरहजर राहिली. 'सुपर डान्सर-4' या शोच्या आगामी एपिसोडचे शूटिंग मंगळवारी (20 जुलै) मुंबईमधील फिल्मसिटीमध्ये होणार होते. मात्र शिल्पाच्या कुटुंबावर ओढावलेल्या संकटामुळे निर्मात्यांना सध्या दुसरा पर्याय शोधावा लागत आहे. अगदी शेवटच्या क्षणी शिल्पा शेट्टीने तिचं शूटिंग रद्द केलं. त्यामुळे गीता कपूर, अनुराग बासू आणि करिश्मा कपूर या तीन परीक्षकांच्या उपस्थितीमध्ये या शोचे शूटिंग पूर्ण करण्यात आले. (raj kundra arrest shilpa shetty cancelled super dancer 4 show shooting)

पुढील काही दिवस शिल्पा शूटिंगला येऊ शकणार नसल्याने निर्मात्यांनी करिश्मालाच पुढील दोन दिवसांच्या शूटिंगसाठी विचारलं आहे. एवढंच नाही तर शिल्पा जर शोमध्ये पुन्हा आली नाही तर करिश्मा कपूर शिल्पाची जागा घेऊ शकते, असंही म्हटलं जातंय.

हेही वाचा: 'क्राईम पेट्रोल' फेम अनुप सोनी खऱ्या आयुष्यातही बनला क्राईम सीन इन्व्हेस्टिगेटर

शिल्पा सध्या तिच्या जुहू येथील घरी बहीण शमिता आणि मुलांसोबत आहे. सोमवारी रात्री राज कुंद्राला अटक झाली. त्यानंतर त्याला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्रा याने पॉर्न चित्रफीत निर्माण करून त्याच्या प्रसारणासाठी 2019 मध्ये आर्म्स प्राईम मीडिया नावाने कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून पॉर्न चित्रफीती प्रसारणासाठी तयार करण्यात आलेले हॉटशॉट्स नावाचे ॲप्लिकेशन लंडनस्थित केनरीन कंपनीला विकले. पण या ॲप्लिकेशनबाबतची बरीच कामे कुंद्रामार्फतच चालू होती. या ॲप्लिकेशन निर्मितीसाठी राज कुंद्राने सुमारे 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा अंदाज आहे. कुंद्रा हा पॉर्नोग्राफी प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे गुन्हे शाखेला मिळाले आहेत. कुंद्रासह मालमत्ता कक्षाने कारवाई करून या अश्लील ॲप्लिकेशनची माहिती तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख रायन जॉन मायकल थॉर्प यालाही अटक केली आहे. कुंद्रा व थॉर्प दोघांनाही न्यायालायने 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा: शिल्पा शेट्टीचा अश्लील चित्रपट प्रकरणात सहभाग?, पोलिसांनी दिले उत्तर

loading image