पोर्नोग्राफी प्रकरणानंतर राज कुंद्रा पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय

अकाऊंटचा चेहरामोहरा बदलला,पत्नी शिल्पा शेट्टीला फॉलो करण्यापासून वगळले
Raj Kundra with Shilpa Shetty
Raj Kundra with Shilpa ShettyGoogle

राज कुंद्राची(Raj Kundra) ओळख त्याच्या पोर्नोग्राफी प्रकरणापूर्वी पर्यंत तरी शिल्पा शेट्टीचा(Shilpa Shetty) करोडपती नवरा किंवा शिल्पा शेट्टीचा बिझनेसमन नवरा अशी होती. पण त्याच्या या करोडो कमावण्यामागचं रहस्य समोर आलं अन् ज्यानं-त्यानं तोंडात बोट घातली . २०२१ च्या जुलै महिन्यात त्याचं पोर्नोग्राफी प्रकरण समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आणि तब्बल दोन महिन्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. त्याच्याविरोधात अनेक मॉडेल्सनी तक्रार नोंदवल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली होती. जामिनावर तो सुटला असला तरी अद्यापही त्याच्या डोक्यावर टांगती तलवार आहेच.

Raj Kundra with Shilpa Shetty
सेल्फीच्या नादात नवाजुद्दिन सिद्दिकीला चाहत्यांनी फरफटत नेलं

राज कुंद्राचं हे पोर्नोग्राफी प्रकरण बाहेर निघण्यापूर्वी तो सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह होता. तो शिल्पासोबतचेही अनेक फनी व्हिडीओ शेअर करीत असे. पण पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यानंतर तो जेलमधून जेव्हा बाहेर आला तेव्हा पहिलं काम त्यानं केलं ते आपले जुने सगळे सोशल मीडियावरचे अकाऊंट त्यानं बंद केले. त्यानंतरही काल-परवापर्यंत तो सोशल मीडियावर दिसतच नव्हता. पण आता नुकतंच त्याचं अकाऊंट इन्स्टाग्रामवर त्यानं ओपन केलेलं दिसून येतंय. त्यानं एकही पोस्ट तिथे केलेली दिसत नाही पण फॉलोअर्सची संख्या मात्र वेगानं वाढताना दिसतेय त्याच्या अकाऊंटवर. त्यानं मात्र फक्त त्याच्या रेस्टॉरंटला फॉलो केलंय. इतर कुणालाही त्यानं फॉलो केलेलं नाही. इतकंच काय तर पत्नी शिल्पा शेट्टीलाही त्यानं या लिस्टमधून वजा केलेलं दिसून येतय.

Raj Kundra Instagram account image
Raj Kundra Instagram account imageInstagram

त्याचं हे अकाऊंट प्रायव्हेट आहे. त्यानं आपल्या अकाऊंटच्या डिस्क्रीप्शन मध्ये लिहिलंय,''लव्ह युअर लाईफ''. पोर्नोग्राफी प्रकरणात जेलची हवा खाऊन आल्यानंतर त्यानं लोकांसमोर येणं टाळलं होतं, पण काही दिवसांपूर्वींच तो पत्नी शिल्पासोबत शिर्डीला साईबाबांच्या मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी गेला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com