esakal | मुंबई पोलिसांच्या हाती लागले ७० व्हिडीओ; राज कुंद्राला मिळायचे ९.६५ लाख रुपये
sakal

बोलून बातमी शोधा

raj kundra

मुंबई पोलिसांच्या हाती लागले ७० व्हिडीओ; राज कुंद्राला मिळायचे ९.६५ लाख रुपये

sakal_logo
By
स्वाती वेमूल

पॉर्न फिल्म रॅकेटमध्ये व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा Shilpa Shetty पती राज कुंद्रासोबत Raj Kundra आरोपी उमेश कामतसुद्धा Umesh Kamat अटकेत आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान मुंबई क्राइम ब्रांचला राज कुंद्राच्या घरातून ७० व्हिडीओत मिळाल्याची माहिती समोर येत आहे. हे ७० व्हिडीओ उमेश कामतने शूट केल्याचं समजतंय. क्राइम ब्रांचने राज कुंद्राच्या घरी धाड टाकली. त्यावेळी त्यांना राजचा सर्व्हरसुद्धा जप्त केला. कामतने हे सर्व व्हिडीओ विविध प्रॉडक्शन हाऊसच्या मदतीने बनविल्याचं म्हटलं जात आहे. याशिवाय हॉटशॉट्स अॅपवर अपलोड केलेले २० ते ३० मिनिटांपर्यंतचे एकूण ९० व्हिडीओ क्राइम ब्रांचच्या हाती लागले आहेत. (Raj Kundra Case Crime branch Recovers 70 Videos Shot By His Ex PA Umesh Kamat slv92)

मुंबई पोलीस जप्त केलेला सर्व्हर फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवणार असून केनरिन या कंपनीसाठी राजने पॉर्नोग्राफिक व्हिडीओ अपलोड केले होते का, याची माहिती मिळवणार आहेत. पोलिसांनी आतापर्यंत राज कुंद्राशी संबंधित विविध लोकांच्या बँक खात्यातील ७.२१ कोटी रुपये गोठवले आहेत. राजच्या खात्यात हिट हॉट या पॉर्न अॅपकडून ९.६५ लाख रुपये नियमितपणे जमा होत असल्याचीही माहिती समोर आली. तर दुसरीकडे राज कुंद्राने पॉर्नोग्राफिक कंटेट बनविल्याच्या आरोपांना फेटाळले आहेत. राज कुंद्राच्या वियान इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एलजी स्ट्रीमिंग या दोन कंपन्यांमध्ये पोलिसांनी धाड टाकली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, स्ट्रगलिंग मॉडेल्स आणि अभिनेत्रींच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा उचलत आरोपींनी त्यांना पॉर्नोग्राफिक व्हिडीओत काम करण्यास भाग पाडलं होतं.

हेही वाचा: कंटेट अश्लील होता, पण त्याला पॉर्न म्हणता येणार नाही- राज कुंद्राचे वकील

हेही वाचा: राज कुंद्रा प्रकरणात आरोपी म्हणून वापरला अभिनेता उमेश कामतचा फोटो

कोण आहे आरोपी उमेश कामत?

पॉर्नोग्राफी प्रकरणात मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या उमेश कामतला मालमत्ता कक्षाने अटक केली होती‌. हॉटशॉट्स नावाच्या ॲप्लिकेशनवर कामत व्हिडीओ अपलोड करायचा. अभिनेत्री गहना वशिष्ठकडून आलेले व्हिडीओ कुठे व कसे शेअर करायचे यासाठी तो मध्यस्थ म्हणून काम पाहत होता. गहनाला एका व्हीडीओमागे 80 लाख रुपये मिळत होते. कामत हा कुंद्राशी संबंधित एका कंपनीत कामाला होता. कामतच्या अटकेनंतर त्याने चौकशीदरम्यान राज कुंद्राचे नाव घेतले होते. पण हातात ठोस पुरावे नसल्यामुळे त्यावेळी कुंद्राला अटक झाली नाही.

loading image