esakal | 'ती तसं करू शकत नाही'; निर्मात्याने घेतली शिल्पाची बाजू
sakal

बोलून बातमी शोधा

shilpa shetty, raj kundra

'ती तसं करू शकत नाही'; निर्मात्याने घेतली शिल्पाची बाजू

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

पती राज कुंद्राच्या (raj kundra) अश्लील व्हिडिओ प्रकरणाच्या अटकेमुळे बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa shetty) सध्या चर्चेत आहे. शिल्पाचा 'हंगामा- 2' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून राजच्या प्रकरणामुळे शिल्पाच्या या चित्रपटावर काय परिणाम होईल? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नुकतेच 'हंगामा-2' च्या निर्मात्यांनी याबाबत आपले मतं मांडले. (raj kundra case film producer ratan jain support actress shilpa shetty)

निर्माते रतन जैन यांनी घेतली शिल्पाची बाजू

नुकत्याच झालेल्या मुलाखतीमध्ये 'हंगामा-2' चित्रपटाचे निर्माते रतन जैन यांनी शिल्पाची बाजू घेत आपलं मतं मांडले. त्यांनी सांगितले, 'मी जेवढे शिल्पाला ओळखतो, त्यावरून असे सांगतो की ती अशा काही प्रकरणात सामील असेल असे मला वाटत नाही. मी हे सांगू शकत नाही की शिल्पाला तिच्या पतीच्या व्यावसायाबद्दल किती पाहिती आहे. पण शिल्पा अशा प्रकारचं काम करू शकत नाही.' शिल्पाच्या 'हथियार' (2002) आणि 'धड़कन' (2000) या चित्रपटाची निर्मीती रतन जैन यांनी केली आहे. काही दिवसांपुर्वी शिल्पाने हंगामा-2 चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते.

हेही वाचा: राज-शिल्पाची आर्थिक कोंडी? 'सेबी'नं ठोठावला मोठा दंड

अश्लील चित्रफितींची निर्मिती व प्रसारणप्रकरणी अटकेत असलेल्या राज कुंद्राला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. हॉटशॉट या अ‍ॅपद्वारे राज कुंद्राने अश्लील चित्रफितींचे चित्रण केले. राज हा त्याच्या हॉटस्पॉट नावाच्या अॅपच्या माध्यमातून 34 कोटी रुपये कमविण्याच्या विचारात असल्याची माहितीही यापूर्वी समोर आली आहे. याशिवाय अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनी त्याच्याविरोधात प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलीवूडच्या वेगवेगळ्या अभिनेत्रींना राजनं अप्रोच केला होता. त्यापैकी नेहा धुपिया, किम शर्मा, नोरा फतेही, सेलिना जेटली या अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत.

हेही वाचा: मला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं, शिल्पाचा खुलासा

loading image
go to top