राज-शिल्पाची आर्थिक कोंडी? 'सेबी'नं ठोठावला मोठा दंड

दिवसेंदिवस अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती राज कुंद्रच्या (raj kundra) अडचणीत वाढ होत चालली आहे.
raj kundra shilpa shetty
raj kundra shilpa shettyfile image

मुंबई - दिवसेंदिवस अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती राज कुंद्रच्या (raj kundra) अडचणीत वाढ होत चालली आहे. त्याच्याबाबत वेगवेगळे खुलासे समोर आले आहे. मुंबई क्राईम ब्रँचनं त्याला पॉर्नोग्राफी व्हिडिओ तयार करणं आणि ते शेयर करणं याप्रकरणी अटक केली. मात्र अटकेनंतर केलेल्या तपासाता वेगवेगळे खुलासे समोर आलेत. यात अनेक अभिनेत्रींनी गौप्यस्फोटही केले आहेत. यासगळ्याचा परिणाम राजच्या सुनावणीवरही झाला आहे. त्याला न्यायालयानं जामीनही फेटाळला आहे. आता त्याच्याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. (sebi imposes a penalty of 3 lakhs on actor shilpa shetty and raj kundra yst88)

सेबीनं (sebi) (सिक्युरिटी अँड एक्सजेंज बोर्ड ऑफ इंडिया) राज आणि शिल्पाला तीन लाखांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे या दोघांनाही पुन्हा एकदा जोरदार धक्का यानिमित्तानं बसला आहे. एएनआयनं केलेल्या व्टिटमध्ये याबाबतची अधिक माहिती देण्यात आली आहे. त्या व्टिटनुसार, उद्योगपती राज कुंद्रा आणि वियान इंडस्ट्रीज यावर व्यवसाय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळे या दोन्ही पती पत्नीच्या अडचणीत वाढ झाली आहे

raj kundra shilpa shetty
मनामनात घर केलेला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' 13 वर्षे घराघरात

सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना या दोन्ही सेलिब्रेटींना सामोरं जावं लागत आहे. राज हा त्याच्या हॉटस्पॉट नावाच्या अॅपच्या माध्यमातून 34 कोटी रुपये कमविण्याच्या विचारात असल्याची माहितीही यापूर्वी समोर आली आहे. याशिवाय अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनी त्याच्याविरोधात प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात पुनम पांडे, शर्लिन चोप्रा यांची नावं घ्यावी लागतील.

बॉलीवूडच्या वेगवेगळ्या अभिनेत्रींना राजनं अप्रोच केला होता. त्यापैकी काही नावं समोर आली आहेत. नेहा धुपिया, किम शर्मा, नोरा फतेही, सेलिना जेटली अशी ती नावं आहेत. आता सेलिनाच्या प्रवक्त्यानं एक माहिती दिली आहे. जेव्हा राजला अटक झाली तेव्हा त्याच्या अॅपमध्ये सेलिनाला काम करण्यासाठी ऑफर देण्यात आली होती. अशी माहिती समोर आली आहे. मात्र सेलिनाच्या त्या प्रवक्त्यानं ही माहिती खोटी असल्याचं सांगितलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com