esakal | राज कुंद्राबद्दल आदित्य ठाकरेंचे जुनं ट्वीट चर्चेत; राणेंनी पोस्ट केला स्क्रीनशॉट
sakal

बोलून बातमी शोधा

Raj-Kundra-Aaditya-Thackeray

राज कुंद्राबद्दल आदित्य ठाकरेंचे जुनं ट्वीट चर्चेत; पाहा स्क्रीनशॉट

sakal_logo
By
विराज भागवत

राणेंनी पोस्ट केला स्क्रीनशॉट; राज कुंद्रा सध्या पॉर्न व्हिडीओ, वेब सिरीज बनवल्याबद्दल अटकेत

मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली. याचदरम्यान, राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray Tweet) यांचे जुनं ट्विट सध्या चर्चेत आले आहे. काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून ते विविध अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावण्यात आलं. त्याची कसून चौकशी केल्यानंतर अखेर त्याला अटक करण्यात आली. राज कुंद्रा सध्या पोलिस कोठडीत (Police Custody) आहे. अशा वेळी आदित्य ठाकरेंच्या एका जुन्या ट्विटचा फोटो पोस्ट चर्चेत आला आहे.

हेही वाचा: ठाणे: "लेडीज बार तुडुंब भरून कोणाच्या आशीर्वादाने सुरू होते?"

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी २४ नोव्हेंबर २०१५ रोजी राज कुंद्राच्या एका ट्वीटला उत्तर दिलं होतं. राज कुंद्रा यांनी आदित्य ठाकरे आणि दिनो मोरिया या दोघांना ट्विटमध्ये टॅग करून जेवणाचा वेळ उत्तम गेला असं लिहिलं होतं. तसेच, यापुढे आपण वरचेवर भेटूया असंही लिहिलं होतं. त्यावर आदित्य ठाकरे यांनीही राज कुंद्राच्या ट्वीटला रिप्लाय देत 'नक्कीच, आपण जेवणासाठी भेटूया' असं लिहिलं होतं. तोच फोटो ट्विट करत निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

हेही वाचा: Hotshots बंद झाल्यानंतरही राज कुंद्राकडे होता 'प्लान बी'

दरम्यान, राज कुंद्राला अटक झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर शिल्पा शेट्टीच्या नावाने भरपूर मीम्स व्हायरल होत आहेत. काही मीम्समध्ये शिल्पा अश्रू पुसताना दिसत आहे, तर काही मीम्समध्ये विविध चित्रपटांमधील लोकप्रिय डायलॉग्सचा संदर्भ राज कुंद्राच्या अटकेशी जोडलेला पाहायला मिळतोय. इन्स्टाग्रामशिवाय ट्विटरवरही युझर्स शिल्पा शेट्टीला ट्रोल करत आहेत. ‘बिचारी शिल्पा शेट्टी योगामध्ये व्यस्त होती आणि तिचा पती राज कुंद्रा अश्लील चित्रपट बनवत राहिला...’ अशा प्रकारच्या कमेंट्स आणि मीम्स सध्या ट्विटरवर व्हायरल होताना दिसत आहेत.

loading image