Raj Kundra: शर्लिनवर बोलण्यास राज घाबरला.... ट्विट केलं डिलिट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Kundra
sherlyn chopra

Raj Kundra: शर्लिनवर बोलण्यास राज घाबरला.... ट्विट केलं डिलिट

साजिद खान प्रकरणावरुन शर्लिन आणि रेखा यांच्यात कॅट फाइट सुरु आहे. दोघीही एकमेकींवर अगदी खालच्या थराला जात टिका करतांना दिसताय. राखीने शर्लिनला पागल कुत्री तर शर्लिनने राखीला भाड्यावर नवरे आणि प्रियकर बनवते असे अनेक आरोप केलेत. राखीने तर शर्लिन ही पॉर्न स्टार असल्याचं म्हटंलय. मात्र या दोघींच्या वादात आता राज कुंद्रा यांनीही उडी मारल्यांच दिसतेय.

हेही वाचा: Rakhi vs Sherlyn: शर्लिन ‘पागल कुत्री’ तर राखी 'भाड्याने नवरे अन् बॉयफ्रेंड बनवते'; दोघींचा एकमेकींवर हल्लाबोल...

प्रसिद्ध उद्योगपती आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे बराच चर्चेत आहे. शर्लिनने साजिद खान बरोबरच राज कुंद्रावरही अनेक आरोप केले होते. त्यामुळे शर्लिनची चर्चा सुरु झाल्यानंतर राज कुंद्राही स्वत:ला प्रतिक्रिया देण्यापासून रोखू शकलेला नाही.

राज कुंद्राने ट्विट करून लिहिले होते की, "शर्लिन चोप्राची इतकी लायकी नाही की तिच्यावर  ट्विट करावं पण ती कायदेशीर नोटीस पाठवून तिचा चुकीचा मुद्दा सिद्ध करत आहे. तिने स्वत: तिचा पोर्नोग्राफी कंटेट अपलोड केला आहे आणि आता ती पायरेटेड आणि व्हायरल असल्याचे सांगत आहे. कोणीही सहजपणे याला गुगल करू शकतो. त्याने त्याच्या ट्विटसोबत शर्लिनच्या व्हिडिओची लिंकही शेअर केली आहे." मात्र, नंतर राज कुंद्राने त्यांचे ट्विट डिलीट केलेय.

हेही वाचा: Sajid Khan Fir: 'साजिद तुला सोडणार नाय'! शर्लिन पोलीस ठाण्यात

2021 मध्ये क्राईम ब्रँचने मुंबईत राज कुंद्राविरुद्ध अश्लील चित्रपट बनवून अॅपद्वारे प्रकाशित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. एवढेच नाही तर या प्रकरणात राज कुंद्रा यांना दोन वर्षांसाठी तुरुंगवासही सुनावण्यात आला होता. मात्र, जामीन मिळाल्यानंतर तो बाहेर आला आहे. मात्र तुरुंगातून सुटल्यापासून राज कुंद्रा त्याचा चेहरा लपवतांना दिसत आहे. तो कोणत्याही कार्यक्रमात गेला तरी तो फेस मास्क किंवा वेगवेगळ्या गोष्टींनी त्यांचा चेहरा झाकत असतो.