Rajanikanth Birthday: कोल्हापूरचा शिवाजी साऊथचा सुपरस्टार कसा झाला? रजनीकांत यांच्याविषयी सबकुछ.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajanikanth Birthday conductor to south superstar  struggle story lifestyle family

Rajanikanth Birthday: कोल्हापूरचा शिवाजी साऊथचा सुपरस्टार कसा झाला? रजनीकांत यांच्याविषयी सबकुछ..

Rajanikanth Birthday: "झुण्ड में तो सूअर आते हैं. शेर अकेले ही आता है" हा डायलॉग ऐकला तर आपल्या समोर एकच व्यक्ती येते ती म्हणजे रजनीकांत. आज फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठे सुपरस्टार रजनीकांत यांचा वाढदिवस आहे. आज ते 72 वर्षांचे झाले आहेत.आज फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठ्या अभिमानाने सुपरस्टार म्हणून नाव घेतले जाते पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागली. अनेक हाल सोसले, अत्यंत खडतर प्रवास केला आणि मग ही यश त्यांना मिळालं.. त्यामुळे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया नेमका त्यांचा प्रवास कसं होता..

(Rajanikanth Birthday conductor to south superstar struggle story lifestyle family )

हेही वाचा: Akshaya Deodhar: अक्षया देवधरने व्हिडीओ शेअर करत मानले खास व्यक्तीचे आभार.. कोण आहे ही निधी?

रजनीकांत यांनी ऑफिस बॉय ते बस कंडक्टरपर्यंत काम केले आहे. ना मोहक चेहरा, ना उंची, ना सिक्स पॅक अॅब्स ना देखणा लुक, पण तरीही ते आज फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठे सुपरस्टार आहे. रजनीकांतची जादू साऊथपासून बॉलिवूडपर्यंत चालते. रजनीकांतने एकापेक्षा एक उत्तम चित्रपट केले आहेत, पण अभिनयात येईपर्यंतचा त्यांचा प्रवास आव्हानांनी भरलेला होता.

हेही वाचा: Aai Kuthe Kay Karte: अनघाचं डोहाळजेवण-अभ्याचं लफडं.. आईचं करणार मुलाची भांडाफोड..

रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचे नाव शिवाजीराव गायकवाड होते. रजनीकांत यांना चार भावंडं असून त्यात ते सर्वात लहान होते. रजनीकांत यांचे वडील पोलीस हेड कॉन्स्टेबल होते. रजनीकांत यांच्या आई जिजाबाई यांचे बालपणीच निधन झाले होते.

रजनीकांत यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्यामुळे त्यांनी आधी ऑफिस बॉय म्हणून काम केले आणि त्यानंतर कुली म्हणून सामान उचलायला सुरुवात केली,पण यातून फार काही कमाई झाली नाही. पैशाची गरज असल्याने रजनीकांत यांनी सुताराचे काम सुरू केले. अखेर खूप मेहनतीनंतर त्यांना बीटीएसमध्ये बस कंडक्टरची नोकरी मिळाली. रजनीकांत यांच्या तिकीट विकण्याच्या आणि शिट्ट्या वाजवण्याच्या शैलीने प्रवासी मंत्रमुग्ध झाले.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?


रजनीकांत यांना अभिनय शिकायचा होता पण घरच्यांचा विरोध होता. मात्र, रामकृष्ण मठात शिकत असताना रजनीकांत जेव्हा वेद-पुराण नाटकांमध्ये काम करायचे तेव्हा त्यांच्यात अभिनयाचा किडा जागृत झाला होता. यानंतर रजनीकांत यांनी मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनय शिकण्यास सुरुवात केली. येथे त्यांनी एका नाटकात दुर्योधनाची भूमिका साकारली, जे पाहून दिग्दर्शक के बालचंद्रन खूप प्रभावित झाले.

बस मध्ये लोकांची तिकट काढता काढता त्यांनी त्यांच्या करिअरच तिकट काढलं .कमल हसनसोबत रजनीकांतचा पहिला चित्रपट अपूर्व रागांगलमध्ये काम करण्याची संधी मिळाली. यातील त्यांची भूमिका छोटी होती पण सर्वांना ती खूप आवडली. या चित्रपटानंतर त्यांनी भैरवी या चित्रपटात काम केले, त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही आणि बॉलिवूड आणि साउथ इंडस्ट्रीत एक सो एक सुपरहिट चित्रपट दिले. बॉलीवूड चित्रपटांमधील त्यांची कारकीर्दही खूप प्रभावी होती. दुसरीकडे, साऊथच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये बाशा, पदयाप्पा, अरुणाचलम, थलापथी, मुथू अशी न संपणारी लिस्ट आहे.

फिल्म इंडस्ट्रीत रजनीकांत हे एक असं व्यक्तीमत्व आहे की जिथे त्यांना लोक देव मानतात आणि त्यांच्या फोटोवर दुधाने अभिषेक केला जातो. त्यांच्या चित्रपट गृहात रंजनीकांतची एंट्रीवर पब्लिक पैशांची उधळण करत शिट्या वाजवत इतकेच नव्हेतर रंजनीकांतची फायटिंग सुरू झाली की लोक एकमेकांमध्ये मारामारी करत.

रजनीकांत यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी शिवाजी- द बॉस, रोबोट आणि कबाली सारखे हिट चित्रपट केले आहेत. वयाच्या ७२ व्या वर्षीही रजनीकांत चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. नवीन वर्षात म्हणजेच २०२३ मध्ये रजनीकांत 'जेलर' चित्रपटात दिसणार आहेत. रजनीकांत यांचा अध्यात्माशीही बराच संबंध आहे. आपला कोणताही नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी किंवा काम पूर्ण केल्यानंतर विश्रांतीचे क्षण घालवण्यासाठी ते अनेकदा हिमालयात जातात.

टॅग्स :rajinikanth