दिल, दोस्ती : ‘मृदगंधा’प्रमाणे दरवळणारी मैत्री!

उत्तम दिग्दर्शक, उत्कृष्ट लेखक राजेश मापुस्कर आणि हरहुन्नरी अभिनेता जितेंद्र जोशी. राजेश आणि जितेंद्र यांची मैत्री २०१६ मधील सुपरहिट चित्रपट व्हेंटिलेटरच्या वेळी झाली.
rajesh mapuskar and jitendra joshi
rajesh mapuskar and jitendra joshiSakal
Summary

उत्तम दिग्दर्शक, उत्कृष्ट लेखक राजेश मापुस्कर आणि हरहुन्नरी अभिनेता जितेंद्र जोशी. राजेश आणि जितेंद्र यांची मैत्री २०१६ मधील सुपरहिट चित्रपट व्हेंटिलेटरच्या वेळी झाली.

- राजेश मापुस्कर, जितेंद्र जोशी

उत्तम दिग्दर्शक, उत्कृष्ट लेखक राजेश मापुस्कर आणि हरहुन्नरी अभिनेता जितेंद्र जोशी. राजेश आणि जितेंद्र यांची मैत्री २०१६ मधील सुपरहिट चित्रपट व्हेंटिलेटरच्या वेळी झाली. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश मापुस्कर करत होते तर जितेंद्र यामध्ये ‘प्रसन्न’ नावाची भूमिका साकारत होता.

राजेश मापुस्कर पहिल्या भेटीबद्दल म्हणाले, ‘‘सुरवातीला मी जितेंद्रचे अनेक चित्रपटात काम पाहिले होते. आमची मैत्री फार नंतर झाली. सुरवातीला आम्ही दिग्दर्शक आणि नट म्हणूनच एकमेकांना ओळखायचो. त्यानंतर २०१६मध्ये व्हेंटिलेटर चित्रपटापासून आम्ही एकमेकांना जास्त चांगले ओळखू लागलो. अजूनही आम्ही रात्री दीड दोन वाजता एकमेकांसोबत चॅटवर बोलत असतो.’’ जितेंद्र जोशी पहिल्या भेटीचा किस्सा सांगताना म्हणाला, ‘‘माझी बायको मिताली राजू दादाला या चित्रपटात मदत करत होती, तेव्हा मला तिने याबद्दल थोडी कल्पना दिली होती. माझा एक मित्र तिकडे म्युझिकवर काम करत होता त्याने माझे नाव सुचवले होते. पण त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी कास्ट केले. एके दिवशी समजले, की त्याने तो चित्रपट सोडला आणि त्याच्या जागी मला बोलावले. मी तिकडे गेलो माझी ऑडिशन झाली. त्यानंतर त्यांनी मला स्क्रिप्ट ऐकवली. तो शांतपणे सगळ्या गोष्टी सांभाळत होता. राजेशच्या टिमचा सदस्य व्हावे असे मला वाटले आणि मी त्यात सामील झालो. राजेश तीन वर्षांतून एकदा चित्रपट तयार करतो, पण ते चित्रपट मास्टरपीस असतात.’’

राजेशने जितेंद्रच्या ‘गोदावरी’ चित्रपटाबद्दल सांगितले. ‘‘जितेंद्रने त्या गोष्टींना समजून घेऊन ज्या पद्धतीने अभिनय साकारला आहे, ही गोष्ट खरंच कौतुकास्पद आहे. यासाठी त्यांना मिळालेला पुरस्कार अभिमानाची गोष्ट आहे.’’ राजेश मापुस्कर यांच्या ‘रुद्र’ या वेब सिरिजबद्दल जितेंद्रने सांगितले, ‘‘लहानपणापासून ‘चांदोबा’, ‘चाचा चौधरी’ अशा गोष्टी सांगणारा आपला मोठा भाऊ अचानक हॉरर कथा घेऊन आल्यास होईल, तसे काहीतरी माझं झालं आहे. दोन तीन वेळा मी हा ट्रेलर पाहिला आणि राजेशला फोन केला आणि म्हटलं खरं सांग कोणी दिग्दर्शित केली आहे ही सिरिज. रुद्र सिरिजचा ट्रेलर पाहून माझी छाती अभिमानाने फुलली.’’ राजेशने जितेंद्रच्या स्वभावाबद्दल सांगितले, ‘‘जितू स्वच्छ मनाचा आहे. आरशासारखा पारदर्शक आहे. कलेचे आणि ज्ञानाचे भांडार असलेला एक अद्भुत व्यक्ती आहे.’’ राजेशच्या स्वभावाबद्दल बोलताना जितेंद्रने सांगितले, ‘‘तुम इतना क्यू मुस्कुरा रहे हो क्या गम है जो छुपा रहे हो, असं त्याच वर्णन करता येईल. ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाचे शूटिंग आम्ही कोहिनूर हॉस्पिटलमध्ये करत होतो. शूटिंग सुरू असताना इतर लोकांना त्रास होऊ नये म्हणून कोणीही जोरजोरात बोलायचे नाही, शांततेत शूट करायच असे आम्हाला सांगितले होते. शूटिंग सुरू असताना तिकडे एक रुग्ण होता, ज्याला शूटिंग बघायला यायचे होते. मात्र, ते शक्य नव्हते. राजेश दादा अतिशय शांतपणे त्याच्याशी बोलत होता. राजेश आम्हाला नंतर म्हणाला, ‘‘त्याला काय त्रास आहे, कोणते दुःख आहे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे त्याचे दुःख आपल्याला समजणार नाही. हा असा इतरांचा विचार करणारा माणूस आहे.’’ राजेशला जितेंद्रमधील कविता करण्याचा गुण स्वतःमध्ये आत्मसात करायला आवडेल, तर जितेंद्रला राजेशचे स्मितहास्य, निरागस डोळे आणि त्यातील खरेपणा स्वतःमध्ये घेण्याचा प्रयत्न करायचा आहे.

राजेशने जितेंद्रसोबतच्या मैत्रीचे वर्णन करताना सांगितले, ‘जून महिन्यात तापलेल्या जमिनीवर पावसाचे पहिले थेंब पडल्यावर मोहून टाकणाऱ्या मृदगंधाप्रमाणे आमची मैत्री आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com