राजेश शृंगारपुरे मल्हारराव होळकरांच्या भूमिकेत 

Rajesh Shrungarpure new look of great warrior malharrao holkar serise punyashloka ahilyabai holakar
Rajesh Shrungarpure new look of great warrior malharrao holkar serise punyashloka ahilyabai holakar

मुंबई - प्रेक्षकांना नव्या ऐतिहासिक मालिकेची मेजवानी मिळणार आहे. ती मालिका पुण्यश्लोक अहिल्याबाई. ‘अहिल्याबाई होळकर’  जीवनावर आधारित असणार आहे. त्यातील एका मुख्य भूमिकेसाठी राजेश शृंगारपुरेची निवड करण्यात आली आहे. ती भूमिका मल्हारराव होळकर यांची आहे. या नव्या भूमिकेबद्दल राजेशने आनंद व्यक्त केला असून अशा प्रकारची भूमिका करण्याची आपली पहिलीच वेळ असल्याचेही त्यानं सांगितले आहे.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनच्या वतीनं येत्या काही दिवसांत ऐतिहासिक मालिका – पुण्यश्लोक अहिल्याबाई. ‘अहिल्याबाई होळकर’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यात  8व्या शतकातील इतिहास मांडण्यात आला आहे. अहिल्याबाईंनी आपले सासरे, मल्हारराव होळकर यांच्या सहकार्यानं समाजातील ज्या अनिष्ठ रुढी, परंपरा, चालीरिती होत्या त्यांना विरोध केला. व त्यांचे उच्चाटन केले. तसेच त्यांनी  पितृसत्ताक रुढींचाही विरोध करुन लोककल्याणावर भर दिला. त्यांचे योगदान आणि कार्य हे लोकांना माहिती व्हावे तसेच नव्या पिढीरपर्यत त्यांचे विचार पोहचावेत या दृष्टिकोनातून ही शौर्यगाथा मांडण्यात येणार आहे.

या मालिकेत पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांची भूमिका प्रसिध्द अभिनेता राजेश शृंगारपुरे साकारणार आहे. त्याने यापूर्वी वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.  राणी अहिल्याबाई आणि त्यांचे सासरे मल्हारराव यांच्या जीवनावर आधारित ही मालिका येत्या 4 जानेवारीपासून सोनी एन्टरटेन्मेन्ट टेलिव्हिजनवर ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

आपल्या या नवीन भूमिकेविषयी सांगताना राजेश म्हणाला, मला मल्हारराव होळकर यांची भूमिका साकारता आली याचा आनंद आहे.  मी यापूर्वी काही पौराणिक भूमिका केल्या आहेत. मात्र मल्हारराव यांच्या इतके पराक्रमी ऐतिहासिक व्यक्तिमत्व साकारण्याची माझी पहिलीच वेळ आहे. ज्यावेळी मला ही भूमिका साकारण्यासाठी विचारण्यात आले तेव्हा मी ही भूमिका करायची हे लगेच ठरवले. आपल्या इतिहासातील एक उत्तम शासक म्हणून मल्हारराव यांचे नाव घेता येईल. ती भूमिका साकारण्याची संधी मिळते आहे याचा आनंद व अभिमान वाटतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com