सुशांत सिंह राजपूत करणार होता सारा अली खानला प्रपोज, 'या' व्यक्तीने केला खुलासा

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 5 September 2020

काही दिवसांपूर्वीच सुशांतने थायलंड ट्रीपला जाताना खास सारासाठी चार्टर्ड विमान बुक केल्याचं देखील समोर आलं होतं. दोघांविषयी चर्चो होऊ नये म्हणून या खास विमानाची सोय सुशांतने केल्याचं म्हटलं जात होत. त्यातंच आता या दोघांबद्दल आणखी एक नवी माहिती समोर येत आहे.

मुंबई- दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत 'केदारनाथ' सिनेमाच्या शूटींग दरम्यान को-स्टार सारा अली खानला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. काही दिवसांपूर्वीच सुशांतने थायलंड ट्रीपला जाताना खास सारासाठी चार्टर्ड विमान बुक केल्याचं देखील समोर आलं होतं. दोघांविषयी चर्चो होऊ नये म्हणून या खास विमानाची सोय सुशांतने केल्याचं म्हटलं जात होतं. त्यातंच आता या दोघांबद्दल आणखी एक नवी माहिती समोर येत आहे. सुशांत सिंह राजपूत अभिनेत्री सारा अली खानला प्रपोज करणार होता असा खुलासा एका व्यक्तीने केला आहे. 

हे ही वाचा: ड्रग्स प्रकरणासंबंधी साऊथ अभिनेत्रीच्या घरावर सीसीबीचा छापा, अभिनेत्रीला घेतलं ताब्यात

सुत्रांच्या माहितीनुसार, सुशांतच्या लोणावळा येथील फार्महाऊसच्या केअर टेकरने दावा केला आहे की जानेवारी २०१९ मध्ये सुशांतने साराला प्रपोज करण्याचा प्लान केला होता. सप्टेंबर २०१८ ते जुलै २०२० पर्यंत फार्महाऊसचे केअर टेकर असलेल्या रईस यांनी सांगितलं की त्यांना हे प्रपोजल लग्नाबद्दल होतं की आणखी कशाबद्दल हे माहित नाही. त्यांनी सांगितलं की सारा अली खान २०१८ मध्ये नेहमी फार्महाऊसवर येत जात होती मात्र २०१९ पासून ती कधीच आली नाही. 

रईस यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितलं की 'सुशांत सरांसोबत सारा मॅडम २०१८ पासून फार्महाऊसवर यायला लागली होती. ते जेव्हा येत होते तेव्हा ४-५ दिवस राहायचे. डिसेंबर २०१८च्या थायलंड ट्रीपवरुन आल्यानंतर सुशांत सर आणि सारा मॅडम थेट फार्महाऊसवर आले होते. ते रात्री जवळपास १० ते ११ च्या दरम्यान आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र देखील होते.'

रईस यांनी साराची स्तुती करत म्हटलं की 'तिचा स्वभाव फार्महाऊसच्या कर्मचा-यांप्रती खूपंच छान होता. मला रईस भाई आणि कामवालीला मावशी म्हणायची. दोघांच्या नात्याबद्दल बोलताना रईसने सांगितलं की असं ऐकलं होतं की सुशांत सारा अली खानला त्यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून प्रपोज करणार होता. मात्र हे प्रपोजल लग्नासाठी होतं की आणखी कशासाठी याबद्दल नेमकं माहित नाही.पण सुशांत सरांच्या मित्राला प्रपोजल गिफ्टबाबत बोलताना मी ऐकलं होतं. मात्र  फेब्रुवारी-मार्च २०१९ दरम्यान त्यांच ब्रेकअप झाल्याचं कळालं. त्यानंतर सारा कधीच फार्महाऊसवर आली नाही.'    

sushant singh rajput to propose sara ali khan this person revealed  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput to propose sara ali khan this person revealed