New Year 2024: फ्लाईंग किस अन्... थलायवानं केलं चाहत्यांचं न्यू इयर हॅप्पी! रजनीकांतचा व्हिडिओ व्हायरल

साउथ सुपरस्टार रजनीकांत यांनी देखील आपल्या चाहत्यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Rajinikanth greets fans gathered outside his Chennai home on New Year
Rajinikanth greets fans gathered outside his Chennai home on New Year

New Year 2024:  सर्वजण नवीन वर्षाचे स्वागत करत आहेत. एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. सर्व सामान्यापासून ते बॉलिवूड कलाकरांपर्यंत सर्वांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत सोशल मिडियावर पोस्ट शेयर केली आहे.

अमिताभ बच्चन, अनिल कपूर, अजय देवगण, वरुण धवन, करिना कपूर, करिष्मा सर्वांनी चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर आता अनेक कलाकारांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

तर आता साउथ सुपरस्टार रजनीकांत यांनी देखील आपल्या चाहत्यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Rajinikanth greets fans gathered outside his Chennai home on New Year
Akshay Kumar : अक्षय कुमारची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत पुन्हा 'मन की बात'! यावेळी तर चक्क...

सुपरस्टार रजनीकांत यांनी चेन्नईत कुटुंबासोबत नवीन वर्ष साजरे केले. रजनीकांत यांच्या घराबाहेर चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यावेळी रजनीकांत यांनी घराच्या गेटवर येऊन चाहत्यांची भेट घेतली. त्यांनी चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि हात जोडून सर्वांचे आभार मानले. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रजनीकांत यांनी 'वेट्टैयान'च्या शूटिंगमधून ब्रेक घेतला आणि वर्षातील पहिल्या खास दिवशी पत्नी लता, मुली आणि नातवंडांसोबत वेळ घालवला आहे.

Rajinikanth greets fans gathered outside his Chennai home on New Year
Ashvini Mahangade: "गड- किल्ले यांच्या चरणी...", अभिनेत्रीने नवीन वर्षासाठी केलाय भन्नाट संकल्प

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रजनीकांत हे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जेलर चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला.

सुपरस्टार रजनीकांत आता लवकरच चित्रपट निर्माते लोकेश कांगराज यांच्या 'थलाईवर 171' चित्रपटात दिसणार आहे. प्रोडक्शन हाऊस सन पिक्चर्सने याची घोषणा केली होती.

तर वेट्टैयान' हा सिनेमा TJ Gnanvel दिग्दर्शित Lyca Productions निर्मित अॅक्शनपट आहे. रजनीकांत, फहद फसिल, राणा दग्गुबती, अमिताभ बच्चन, मंजू वॉरियर, रितिका सिंग आणि दुशारा विजयन यांच्यासह अनेक स्टार्स या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com