
नुकतंच बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अभिनेता अफ्ताब शिवदासानी या लॉकडाऊनमुळे लंडनमध्ये अडकले असताना मराठी सिनेअभिनेत्री 'सैराट' फेम 'आर्ची' म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू देखील लंडनमध्ये अडकली आहे.
मुंबई: कोरोनाचं संकट काही संपता संपत नाहीये. नुकतंच कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे लंडनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे परदेशात असलेल्या अनेक नागरिकांची पुन्हा गैरसोय झाली आहे. अनेक सेलिब्रिटी शूटींगसाठी परदेशात आहेत. नुकतंच बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अभिनेता अफ्ताब शिवदासानी या लॉकडाऊनमुळे लंडनमध्ये अडकले असताना मराठी सिनेअभिनेत्री 'सैराट' फेम 'आर्ची' म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू देखील लंडनमध्ये अडकली आहे.
हे ही वाचा: 'कुबूल है, कुबूल है, कुबूल है' म्हणत गौहर-जैदचा निकाह संपन्न, पाहा फोटो
ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनमुळे अनेकजण लंडनमध्ये अडकले आहे. रिंकू राजगुरु तिच्या आगामी ‘छूमंतर’ सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने सध्या लंडन दौर्यावर आहे. रिंकूसोबतच ‘छूमंतर’ सिनेमाची संपूर्ण टीम सध्या लंडनमध्ये अडकली आहे. याचा फटका फक्त रिंकूला बसला नसून संपूर्ण सिनेमाच्या टीमला बसला आहे. यामध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहरे, ऋषी सक्सेना, सुव्रत जोशी आणि ’नाळ’ सिनेमातील बालकलाकार श्रीनिवास पोकळेही इंग्लंडमध्ये शुटिंग करत आहे. लंडनमध्ये पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याने अनेक सेलिब्रिटी परतण्यासाठी विमानप्रवास बंद केल्याने अडकले आहेत.
'सैराट' सिनेमानंतर रिंकूने सगळ्यांवरंच जादू केली होती. मात्र या सिनेमानंतर तिचे जे सिनेमे आले ते फारशी कमाल करु शकले नाहीत. तिने सिनेमांव्यतिरिक्त वेब सीरिजमध्ये देखील तिचं नशीब आजमावलं. छुमंतर या सिनेमाच्या निमित्ताने रिंकूची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय ट्रीप आहे. हा पहिला वहिला आंतरराष्ट्रीय ट्रीपचा अनुभव शेअर करताना रिंकू सांगते, ’मुंबई ते लंडन या प्रवासादरम्यान मी अत्यंत आनंदी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळांवर योग्य ती काळजी घेण्यात येत आहे.’ अशी प्रतिक्रिया रिंकूने दिली आहे.
एका गावापासून सुरु झालेला तिचा हा प्रवास प्रेक्षकांच्या प्रेमामुळे थेट लंडनपर्यंत जाऊन पोहोचला आहे. रिंकूने सोशल मीडियावर तिचे इंग्लंडमधील काही फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. तिचे हे फोटो व्हायरल होत असून यामध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय. तिने स्वतःवर घेतलेली मेहनत तिच्या लूकमधून दिसून येतेय.
sairaat actress rinku rajguru stuck in london due to second corona strain lockdown in uk