रोबोटचा सिक्वेल 2.0 : रजनीकांतचा ट्रिपल रोल

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्ये 'रोबोट' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस यश मिळविल्यावर आता या चित्रपटाचा पुढील भाग (सिक्वेल) येत आहे. या सिक्वेलचे नाव '2.0' असे असून, सुपरस्टार रजनीकांत त्यामध्ये 'ट्रिपल रोल' करणार आहे. 

काल्पनिक विज्ञानकथा (Sci-Fi) असलेल्या 'रोबोट'ला देशभरात सर्वत्र जोरदार प्रतिसाद मिळाला होता. त्यामध्ये वसीकरा नावाचा शास्त्रज्ञ आणि रोबोट अशी दुहेरी भूमिका साकारली होती. यावेळी '2.0' मध्ये रजनीकांत एक पाऊल पुढे जात तीन पात्रं साकारणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दिग्दर्शक शंकर यांच्या या चित्रपटात वसीकरा या व्यक्तिरेखेशिवाय आणखी दोन पात्रं रजनीकांत मोठ्या पडद्यावर साकारणार आहे. 

सिक्वेलच्या कथेमध्ये दुष्ट रोबोटला मोडून टाकण्यासाठी वसीकरा एक 'बॅड रोबोट' तयार करतो. मात्र, तो मोठ्या प्रमाणावर विध्वंस करू लागतो. त्या दोन्ही रोबोटची पात्रं रजनीकांतच साकारत आहे. या दोन रोबोटमधील युद्ध हे चित्रपटातील महत्त्वाचा भाग असून, भारावून टाकणाऱ्या स्पेशल इफेक्ट्समुळे ते चित्रपटाच्या ठळक वैशिष्ट्य ठरणार आहे. 
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटातील खलनायकाची भूमिका अक्षय कुमार साकारत आहे. त्याचा पहिला ट्रेलर 20 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.
 
Web Title: rajinikanth to play triple role in 2.0