थलैवा रजनीचा 'दरबार' आलाय; फॅन्सची दिवानगी पाहून व्हाल थक्क

वृत्तसंस्था
Thursday, 9 January 2020

सुपरस्टार रजनीचा दरबार रिलीज झाल्यानंतर ट्विटर तसेच सोशल मिडीयावर रजनीकांतचीच धूम दिसते आहे. टाॅप 10 ट्रेंड्समध्ये दोन ह्ॅशटॅग दरबार व रजनीकांतच्या संदर्भात दाखवले जात आहेत.

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत याचा दरबार हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा पहिला शो पहाटे साडेतीन वाजता होता. हा शो पाहण्यासाठी एवढ्या पहाटे तसेच कडाक्याच्या थंडीतही प्रेक्षकांची तुफान गर्दी पाहण्यास मिळाली.

रजनीकांतच्या फॅन्सची चर्चा आपण कायमच पाहत व ऐकत आलो आहोत. रजनीकांतच्या फॅन्सची दीवानगी पाहण्यासारखीच असते हे कोणीही नाकारू शकत नाही. काही फॅन्सनी तर रजनीकांत याच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घातला.

तसेच दरबार रिलीज झाल्यानंतर ट्विटर तसेच सोशल मिडीयावर रजनीकांतचीच धूम दिसते आहे. टाॅप 10 ट्रेंड्समध्ये दोन ह्ॅशटॅग दरबार व रजनीकांतच्या संदर्भात दाखवले जात आहेत. ट्विटरवरती रजनीकांत व त्याच्या फॅन्सचे पोस्टर पाहायला मिळत आहेत.

 

पहाटेच्या शो साठीदेखील प्रेक्षकांचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. तसेच आतशबाजी करून या चित्रपटाचे स्वागत केले जात आहे. काही ठिकाणी रजनीकांत याच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घातला जात आहे. तर एका फॅन्सने पोस्टरला 1000 किलोंच्या फुलांचा हार घातला आहे. काही ठिकाणी ढाेल-ताशा लावून या चित्रपटाचे स्वागत केले जात आहे.

प्रत्येक चित्रपटगृहाबाहेर याच चित्रपटाची धूम दिसून येत आहे. फॅन्स रांगेत 4 ते 5 तास उभे राहून टिकीट खरेदी करत आहेत. कसल्याही स्थितीत रजनीकांतच्या फॅन्सना हा चित्रपट आजच पाहायचा आहे. तिकीटांसाठी कितीही पैसे देण्याची या फॅन्सची तयारी आहे. मुंबई, बंगळूर, मद्रास, तमिळनाडूमधील काही चित्रपटगृहाबाहेर तर फ्ॅन्सची तिकीटांसीठी झुंबज उडाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajinikanth starrer film darbar released see here social reaction and fans images and videos