Rajkumar Hirani Dunki : 'डंकी' नंतर राजकुमार हिरानींची वेबसीरिजची घोषणा, 'या' अभिनेत्याच्या नावाला दिली पसंती!

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या डंकी नावाच्या चित्रपटाची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे.
Rajkumar Hirani Dunki Movie Now
Rajkumar Hirani Dunki Movie Nowesakal

Rajkumar Hirani Dunki Movie Now : बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या डंकी नावाच्या चित्रपटाची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून चाहत्यांना त्याची प्रचंड उत्सुकता आहे.

किंग खानचा पठाण, जवाननंतर शाहरुखच्या डंकीविषयी बोलले जात आहे. याच वर्षी शाहरुखच्या पठाण, जवाननं हजारो कोटींची कमाई केली आहे. त्यानंतर आता चाहत्यांना डंकीचे वेध लागले आहे. शाहरुख हा पहिल्यांदाच राजकुमार हिरानी यांच्या डंकी मध्ये काम करताना दिसणार आहे. यापूर्वी त्याला हिरानी यांच्याकडून दोन वेळा ऑफर आली होती. मात्र त्याला त्याच्या इतर प्रोजेक्टमुळे त्यांच्यासोबत काम करता आले नाही.

डंकी हा २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. खरं तर हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच राजकुमार हिरानी यांनी त्यांच्या आगामी एका वेबसीरिजचे काम सुरु केले आहे. ही त्यांची पहिलीच वेबसीरिज असणार आहे. त्यातून ते ओटीटीवर पदार्पण करणार आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, असं म्हटलं जातं आहे की, सायबर सुरक्षा विषयांवर ही मालिका अशणार आहे.

राजकुमार हिरानी हे या मालिकेच्या माध्यमातून अभिनेते विक्रांत मेस्सीला संधी देणार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी विक्रांत मेस्सीच्या १२ वी फेल चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानं बॉक्सऑफिसवर मोठी कमाई केली होती. त्यानंतर तो आता हिरानी यांच्या मालिकेत दिसणार आहे.

हिरानी यांच्या त्या मालिकेचे नाव ठरलेलं नाही. मात्र हिरानी यांनी त्या मालिकेचे काम सुरु केले आहे. विक्रांत त्यात सायबर सुरक्षा तज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहे. हिरानी या मालिकेचे दिग्दर्शन करणार नाही तर ते त्याच्या निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचे दिग्दर्शन अमित सत्यवीर सिंह हे करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com