
अभिनेता राजकुमार राव नेहमीच त्याच्या अभिनयामुळे आणि चित्रपटाच्या आगळ्यावेगळ्या विषयामुळे चर्चेत असतो. न्यूटन, जजमेंटल है क्या, स्त्री, शादी में जरूर आना या चित्रपटांतील हटके भूमिकांमुळे तो चाहत्यांच्या पसंतीस उतरला. आता तो एका हिंदी चित्रपटातील सिक्वेलसाठी सज्ज आहे.
मागील वर्षी आयुषमान खुरानाचा 'बधाई हो' हा चित्रपट आला होता. चित्रपटाच्या भन्नाट विषयामुळे तो चर्चेत आला होता. आता याच चित्रपटाचे सिक्वेल आता येत आहे. 'बधाई दो' हा 'बधाई हो'चा सिक्वेल असेल आणि या, चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत राजकुमार राव व भूमी पेडणेकर असतील. यामध्ये राजकुमार एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारतोय, मात्र चित्रपटाचे कथानक अद्याप उघड झालेले नाही. राजकुमार आणि भूमी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
अभिनेता राजकुमार रावने या वर्षात जवळपास पाच ते सहा बिग बजेट चित्रपट साईन केले आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे "बधाई दो'. एकाच वेळी राजकुमार दोन ते तीन चित्रपटांवर काम करत आहे. विशेष म्हणजे त्याच्या प्रत्येक भूमिका वेगळ्या धाटणीच्या आहेत. "बधाई दो'च्या चित्रीकरणाला तो जूनमध्ये सुरुवात करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.