
Fraud Alert: पॅन कार्डचा गैरवापर करून अभिनेता राजकुमार रावला गंडा
Fraud alert : वेगळे विषय, निवडक भूमिका आणि त्याला न्याय देणारा अभिनेता अशी ख्याती असलेला बॉलिवूडमधील राजकुमार राव (rajkumar rao) हा आघाडीचा नट मानला जातो. त्याच्या कामामुळे त्याची लोकप्रियता सर्वदूर पसरली आहे. तो चाहत्यांसोबतही तितकाच कनेक्ट असतो. त्यासाठी तो सोशल मीडियावर बराच सक्रिय असल्याचे दिसते. आपल्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडी, काही किस्से, चित्रपटांची माहिती याबाबत सोशल मीडियावर तो आवर्जून पोस्ट टाकत असतो. सध्या तो चित्रीकरणात व्यस्त असला तरी त्याच्या एका पोस्टमुळे साऱ्यांचीच खळबळ उडाली आहे. त्याची फसवणूक झाल्याची माहिती त्याने ट्विट द्वारे दिली आहे.
हेही वाचा: संदीप पाठक आंतराष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी
'कोणीतरी माझ्या पॅन कार्डचा (pan card) गैरवापर करून माझ्या नावावर २ हजार ५०० रुपयांचे छोटे कर्ज घेतले आहे. यामुळे माझा सिबिल स्कोअर (Cibil Score) खराब होईल,' असे राजकुमार राव याने ट्विट मध्ये म्हंटले आहे. तसेच 'या संबंधी चौकशी करून कारवाई करा आणि यापुढे असे होणार नाही याची काळजी घ्या,' असे त्याने CIBIL अधिकाऱ्यांना उद्देशून टॅग करत लिहिले आहे.
हेही वाचा: Photo Story : सेलिब्रेटींनी उभारली गुढी; पाहा गुढीपाडव्याचे खास क्षण
राजकुमारची ही पोस्ट वाचून अनेकांना धक्का बसला आहे. अडीच हजारांचे कर्ज तसेच इतक्या कमी रकमेमुळे एखाद्याचा CIBIL स्कोअर खराब होऊ शकतो का? असा प्रश्न चाहत्यांनी विचारला आहे. काहीजण या ट्विटची खिल्ली उडवत आहेत. यामागे काही स्टंट, गम्मत असा उद्देश आहे की खरेच असे घडले आहे, अशी शंकाही नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
'हम दो हमारे दो' आणि 'बधाई दो' हे त्यांचे नुकतेच येऊन गेलेले चित्रपट आहेत. हे दोनही चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले होते. लवकरच 'मोनिका ओ माई डार्लिंग' हा त्याचा आगामी चित्रपट देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या व्यतिरिक्त तो 'गन्स एन्ड गुलाब्स' या वेबसीरिजमध्ये दिसणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Web Title: Rajkummar Raos Pan Card Misused To Take Loan In His Name Actors Credit Rating Hit Fraud
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..