Raju Shrivastava Health Update: राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अत्यंत गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Srivastav Health Update

Raju Shrivastava Health Update: राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अत्यंत गंभीर

Raju Srivastava Health Update : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांच्या तब्येतीबाबत नुकतीच मोठी अपडेट हाली आली आहे. राजू यांच्या प्रकृतीवर औषधांचा कोणताही परिणाम होत नाहीय. त्यांना दोन दिवसांपूर्वी त्यांनी थोडी हालचाल केली होती. परंतु आता पुन्हा त्यांची तब्ये बिघडली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी नव्याने दिलेल्या माहितीने चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल करून एक आठवड्याहून अधिक काळ लोटला असला तरी त्यांना अजूनही शुद्ध आलेली नाही. त्यांचे हृदय आणि नाडी सामान्य काम करत होती. परंतु मेंदूच्या एका भागात दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. मेंदूतील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ही दुखापत झाली आहे. शुक्रवारी 13 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांचा एमआरआय करण्यात आला, ज्यामध्ये मेंदूच्या भागात काही डाग आढळून आले. हे डाग जखमा असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.

राजू श्रीवास्तव यांचे मित्र आणि प्रसिद्ध कॉमेडीयन वेळोवेळी त्यांच्या तब्येतीचे अपडेट देत आहेत. आताच त्यांनी एका व्हिडिओद्वारे 'सकाळ डिजिटल'ला माहिती दिली आहे. यामध्ये सुनील यांनी राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या मेंदूच्या पूर्ण हालचाली बंद झाल्या असून आता आपण फक्त प्रार्थना करू शकतो.'असे ते म्हणाले आहेत.