Raju Srivastav Health Update : राजूसोबत सेल्फी घेण्यासाठी अनोळखी व्यक्ती आयसीयूमध्ये घुसला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Srivastav Latest News

Raju Srivastav : राजूसोबत सेल्फी घेण्यासाठी अनोळखी व्यक्ती आयसीयूमध्ये घुसला

Raju Srivastav Latest News हृदयविकाराचा झटका आल्याने राजू श्रीवास्तवला एम्स रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीने आयसीयूमध्ये प्रवेश केला आणि राजू श्रीवास्तवसोबत (Raju Srivastav) सेल्फी काढण्यास सुरुवात केली. मात्र, सुरक्षारक्षकांच्या लक्षात येताच त्याला हकलण्यात आले. या घटनेनंतर रुग्णालयाची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राजूच्या सुरक्षेची चिंता कुटुंबीयांना आहे.

राजू श्रीवास्तवला (Raju Srivastav) एम्समध्ये १० दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहे. त्याचे चाहते आणि जवळचे लोक राजू लवकरात लवकर बरं होण्याची वाट पाहत आहेत. संसर्ग टाळण्यासाठी कोणालाही आत प्रवेश नाही. दरम्यान, एका अनोळखी व्यक्तीने राजूसोबत सेल्फी घेण्यासाठी आयसीयूमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त आहे. मात्र, आता आयसीयूबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा: ब्रह्मास्त्र प्रदर्शनाच्या वाटेवर अन् आलियाने केले ‘हे’ विधान; काय होणार परिणाम

चाहते आणि जवळचे लोक राजू श्रीवास्तवसाठी प्रार्थना करीत आहे. राजूच्या उपचारासाठी कलकत्त्याहून न्यूरोलॉजिस्टना बोलावण्यात आल्याचे वृत्त आले. राजूचा मित्र शेखर सुमनने (Shekhar Suman) त्याच्या प्रकृतीची माहिती दिली. राजूचे अवयव व्यवस्थित काम करीत असल्याचे राजूच्या कुटुंबातील लोकांनी सांगितले होते. हळूहळू सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

१० ऑगस्ट रोजी ट्रेड मिलवर व्यायाम करीत असताना राजू श्रीवास्तवला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या शरीराची हालचाल होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. तेव्हापासून त्याचे चाहते त्याच्या बरे होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Web Title: Raju Srivastav Health Update Selfie Shekhar Suman

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :selfieshekhar sumanhealth