Raju Srivastav : निवासी आयुक्तांकडे राजू श्रीवास्तवच्या देखभालीची जबाबदारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Srivastav Latest News

Raju Srivastav : निवासी आयुक्तांकडे राजू श्रीवास्तवच्या देखभालीची जबाबदारी

Raju Srivastav Health Updates : राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कॉमेडियनला रुग्णालयात दाखल करून २३ दिवस झाले आहेत, परंतु त्यांची प्रकृतीत सतत बदल होत आहे. नुकतेच त्याला संसर्गामुळे ताप आला होता. त्यानंतर कॉमेडियनचे कुटुंबीय आणि चाहते खूपच चिंतेत पडले होते. तिसऱ्या दिवशी त्याला तापातून पूर्ण आराम मिळाला.

हेही वाचा: तोकडे कपडे घालून गणपती दर्शनाला गेलेल्या गायिकेची फजिती; मंडळाने रोखलं अन्..

राजू यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने निवासी आयुक्तांवर जबाबदारी सोपवली आहे. राजू श्रीवास्तवच्या (Raju Srivastav) भावाने सांगितले की, त्यांची मुलगी अंतरा शनिवारी आयसीयूमध्ये गेली होती. ताप आल्यानंतर केवळ पत्नी शिखा यांनाच आयसीयूमध्ये प्रवेश दिला जात होता. डॉक्टरांनी व्हेंटिलेटर काढण्यास नकार दिला आहे. (Entertainment News)

हेही वाचा: 'लालसिंग चड्ढा' कवडीमोलात विकत घेतलं नेटफ्लिक्सनं, किंमत ऐकून रडवेल आमिर

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तिसऱ्या दिवशी त्याला तापातून पूर्ण आराम मिळाला. राजू यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने निवासी आयुक्तांवर जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या मोठ्या भावाने ही माहिती दिली आहे.

Web Title: Raju Srivastav Health Updates Up Government Give Responsibility To Resident Commissioner

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..