Rakhi Sawant video: आदिल तर गेला आता राखी करतेय दुसरं लग्न? व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rakhi Sawant video

Rakhi Sawant video: आदिल तर गेला आता राखी करतेय दुसरं लग्न? व्हिडिओ व्हायरल

Rakhi Sawant video: मनोरंजन विश्वातील ड्रामा क्वीन राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेत असते. राखीने तिचा नवरा आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आदिल सध्या तुरुंगात आहे. त्याच्यावर केसेस सुरु आहे.

अजूनही राखी आदिलवर अनेक आरोप लावतांना दिसते. तिचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती रडतांना दिसते तर कधी बेशुद्ध झाल्याचं दिसते. मात्र आज विषय वेगळा आहे.

एकिकडे आदिल तुरुंगात असतांना दुसरीकडे राखी नव्या नवरीसारखी तयार झालेली आहे. जणू ती काही लग्नच करणार आहे. तिचा हा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे. त्यामुळं आता नेटकऱ्यांना पुन्हा प्रश्न पडलाय की ती पुन्हा लग्न तर करत नाही आहे ना? तर या व्हायरल व्हिडिओतील राखीच्या आवताराचं खरं कारण काही वेगळचं आहे.

राखी सावंत तिच्या वैयक्तिक अडचणी बाजूला ठेवून आता तिच्या कामावर परतली आहे. राखी सावंत पुन्हा एकदा वधू बनली असून ती लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तुम्ही ते बरोबर ऐकलं, पण ती तिच्या आगामी म्युझिक व्हिडिओसाठी लग्न करत आहे. या व्हिडिओमध्ये राखी सावंत तिच्या नवीन गाण्याचे शूटिंग करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये राखी सावंतही मीडियाशी बोलत आहे.

पापाराझींनी तिला प्रश्न विचारतात की ती पुन्हा लग्न करणार आहे का? ज्यावर राखी जोरात म्हणते की, नाही, मी लग्न केले आहे आणि पुन्हा कधीच नको आहे. मला आयुष्यात कधीही लग्नाचा ड्रेस घालायचा नाही.

राखीने पुढे सांगितले की, आता ती थेट कबरीत जाईल पण लग्न करणार नाही. याशिवाय ती म्हणाला की, आता माझा एकच वर आहे आणि तो तुरुंगात आहे. राखीच्या या व्हिडिओचे सर्वत्र नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडिओवरून पुन्हा सोशल मीडिया यूजर्स राखीला ट्रोल करत आहेत.