
Rakhi Sawant: 'मी तुमच्या पाया पडते', राखी सावंतचं आता मोदींकडे गाऱ्हाण
राखी सावंत सध्या तिच्या वैयक्तिक आयूष्यामुळं चर्चेत आह. ती रोज मिडियासमोर येवून तिचा नवरा आदिलवर नवनवीन आरोप करत असते. राखी सावंतचं लग्न अडचणीत आलं आहे. तिने धर्म बदलून आदिल दुर्राणीशी लग्न तर केलं पण त्यानंतर तिने आदिलवर तिची फसवणूक, मारहाण आणि पैसे आणि दागिने लुटणं यांसारखे अनेक आरोप लावले आहेत. त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर केसही सुरु आहे.
राखी सावंतकडून या केससंबधी रोज नवनवीन अपडेट्स मिळत आहेत. आदिलचं तनू नावाच्या मुलीसोबत अफेअर असून तो बाहेर येताच तिच्याशी लग्न करणार असल्याचही राखीनं सांगितलं आहे. मात्र आता राखीने आदिलला घटस्फोट देण्यास नकार दिला आहे.
अलीकडेच मीडियाशी बोलताना राखीने सांगितले की, आदिलने तिच्यासोबत इस्लामिक आणि कोर्ट मॅरिज केलं आहे. आदिलला इच्छा असूनही राखी त्याला घटस्फोट देणार नाही. यासोबत त्यांनी तिहेरी तलाक कायदा लागू केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. राखीने सांगितले की, हा कायदा तिच्यासाठीही काम करेलं असं तिला कधी वाटलं नव्हते.
राखी म्हणाली, “आदिल कितीही बोला की मी मुस्लिम असेल तर मी चार वेळा लग्न करेन. नाही, मुस्लीमसुद्धा याला परवानगी देत नाहीत. जर तु फक्त लग्न केले असतं तर तुम्ही मला घटस्फोट देऊ शकला असता, पण मोदी जी मी तुम्हाला सलाम करते.. मोदीजी तुम्ही चिरंजीव व्हा . देशातील सर्व महिलां, मोदीजी मी तुमच्या चरणांना स्पर्श करते. सर्व मुस्लिम महिला तुम्हाला सलाम करतो, तुम्ही तिहेरी तलाकवर जो कायदा केला आहे त्याबद्दल आम्ही तुमच्या आभारी आहोत...."