Rakhi Sawant Video: 'मीही फ्रीजमध्ये जाणार...', असं म्हणतं राखीनं स्वत:च्याच कानाखाली घेतल्या मारुन...

Rakhi Sawant Video
Rakhi Sawant VideoEsakala

Rakhi Sawant Video: 'ड्रामा क्वीन' आणि 'बिग बॉस' फेम राखी सावंत सध्या तिच्या पती आदिल खान दुर्रानीसोबत सुरू असलेल्या वादामुळे चर्चेत आहे. ती दररोज काही ना काही धक्कादायक खुलासे करत असते. आदिलवर गंभीर आरोप करत आहे. दररोज तिचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात.

तिने अलीकडेच पापाराझींसमोर स्वत:ला कानाखाली मारण्यास सुरुवात केली, रडू लागली आणि 'मीही फ्रीजमध्ये जाणार होते, पण वाचले' असे म्हणू लागली. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Rakhi Sawant Video
Rakhi Sawant ने नमाज पढताना शेअर केला व्हिडीओ..100 चूका दाखवत लोक म्हणू लागले..

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत ती पापाराझींशी बोलताना दिसतेय. मात्र बोलतांनीच ती कॅमेऱ्यासमोच स्वत:च्या कानाखाली मारण्यास सुरुवात केली. जोरजोरात रडत म्हणते, 'मी आदिलवर प्रेम का केलं?' ज्या मुलींचे मृतदेह फ्रिजमध्ये सापडले होते, त्यांच्यासारखचं दुर्दैव तिचेही होऊ शकतं होतं, असा आरोप राखीने केला आहे. ती म्हणाली, 'मी पण फ्रीजमध्ये जाणार होते...पण वाचले'.

Rakhi Sawant Video
Rakhi sawant: 'गोडीत सांग माझे पैसे कुठे ठेवलेस?', राखी आदिलला भेटायला तुरुंगात...

आदिल खान दुर्रानीला डेट केल्यानंतर राखी सावंतनं त्याच्याशी लग्न देखील केलं. मे २०२२ मध्ये दोघांनी कोर्ट मॅरेज आणि जानेवारी २०२३ मध्ये या लग्नाचा खुलासा केला पण यानंतर जे झालं ते लपून राहिलं नाही.राखीने आदिलवर मारहाण आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आदिलचे तनु नावाच्या मुलीसोबत अफेअर असल्याचेही समोर आले. तो तिच्याशी लग्नही करणार आहे. या सगळ्यामध्ये राखीने गरोधर आणि गर्भपात झाल्याचा खुलासाही केला होता. अजूनही तिचे आरोपांचे सत्र सुरुच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com