Rakhi Sawant: 'राखीशी लग्न नको रे बाबा!' बॉयफ्रेंड आदिलचा नकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rakhi Sawant

Rakhi Sawant: 'राखीशी लग्न नको रे बाबा!' बॉयफ्रेंड आदिलचा नकार

Rakhi Sawant News: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंतला मोठा धक्का बसला आहे. तिचे पुन्हा एकदा ब्रेक अप झाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. तिचा बॉयफ्रेंड आदिल दुरानी सोबत राखी लग्न करणार असल्याचे (Rakhi - Adil) तिनेच सांगितले होते. एका पत्रकार परिषदेमध्ये तिनं याविषयी सांगितले होते. आता मात्र आदिलनं एक मोठा खुलासा करुन चाहत्यांना कोड्यात टाकले आहे. त्या दोघांच्या नात्यात कटूता आल्याची चर्चा सुरु झाली आहे.

काही दिवसांपूर्वी या जोडप्यानं एक पत्रकार परिषद घेऊन आमच्यात सर्व काही आलबेल असल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्याच्या लग्नाची चर्चाही सुरु झाली होती. मात्र आता आदिल आणि राखीच्या नात्यात दरी निर्माण झाली आहे. त्यानं राखीशी लग्न करण्यास नकार दिला आहे. यासगळ्या परिस्थितीला राखीचा स्वभाव कारणीभूत असल्याचे आदिलनं म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून आमच्यात आलबेल नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्याचा परिणाम नात्यावर झाला आहे.

राखीचे कपडे हे एक महत्वाचे कारण -

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राखीच्या खूप तक्रारी आहेत. त्यात महत्वाचे कारण म्हणजे राखीचे कपडे. कुटूंबियांना भेटायला जाताना तिचे कपडे हे आमच्यातील भांडणाचे काऱण आहे. माझ्या फॅमिलीला ती आवडत नाही. तिचं वागणं पसंत नाही. माझ्या कुटूंबाचे राहणीमानाविषयीचे विचार वेगळे आहेत. राखीला हे सगळं माहिती असताना देखील तिचं वागणं काही सुधारलेलं नाही. असे आदिलनं म्हटले आहे.

हेही वाचा: Rakhi Sawant : लग्नाच्या दिवशीच आई व्हायचं; आलियाचे नाव घेत राखीने व्यक्त केली इच्छा

* लग्नाच्या निर्णयावर एकमत नाही...

एका मुलाखतीमध्ये आदिलनं मोठा खुलासा केला आहे. त्यामध्ये त्यानं म्हटलं आहे की, राखी माझ्यावर खूप संशय घेते. त्याचा परिणाम आमच्या नात्यावर झाला आहे. तिला असं वाटतं की, मी अजूनही माझ्या एक्स गर्लफ्रेंडशी बोलतो. तिच्याकडे जातो. राखीला याबाबत अनेकदा सांगूनही ती काही ऐकत नाही. राखीनं तिची काही माणसं देखील माझ्यावर पाळत म्हणून ठेवली आहे. राखीचं असं वागणं आपल्याला आवडत नाही. त्यात मी माझ्या कुटूंबियांना सहभागी करुन घेतले तर आणखी डोक्याला ताप होईल. म्हणून तुर्तास लग्नाचा विचार नसल्याचे आदिलनं म्हटले आहे.

हेही वाचा: Rakhi Sawant: 'पहिले माझे घरचे, मग तुझे कपडे...' बॉयफ्रेंड आदिलनं सांगून टाकलं

Web Title: Rakhi Sawant Adil Duraani Break Up News Refuses To Get Married Viral Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..