Rakhi Sawant: लग्नाच्या काही दिवसातचं राखी सावंतचा घटस्फोट, Video शेअर करत म्हणाली...

ड्रामा क्वीन राखी सावंतने पती आदिल खान याच्यासोबत वेगळं होणार असल्याची घोषणा केली आहे.
Rakhi Sawant
Rakhi Sawantesakal
Updated on

ड्रामा क्वीन राखी सावंतने पती आदिल खान याच्यासोबत वेगळं होणार असल्याची घोषणा केली आहे. तिनं व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

राखी सावंत कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. सध्या ती पती आदिल खानवर केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहे. राखीने आदिलवर फसवणूक आरोप केले आहेत. चार लाख रुपये अन् सोनं घेऊन पळाल्याचा आरोप राखीनं आदिलवर केला आहे. त्याचप्रमाणे आदिल खान याचे तनु चंदेल हिच्यासोबत अफेअर असल्याचा आरोपही केलाय.

राखीचा एक व्हिडओ सध्या व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये 'रोज तोच वाद, नाटकं, तोच तणाव, अखेर आदीलने निर्णय घेतला आहे की तो तनुसोबत राहणार आहे. त्याने मला काल सांगितले आहे की मी तिच्याकडे जात आहे. माझा त्याने वापर केला. असे अनेक आरोप राखीने केले आहेत.

राखी 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. पण शेवटच्या टप्प्यात ती बाहेर पडली. त्यानंतर लगेचच तिच्या आईचे निधन झाले. दरम्यान, आदिल खानसोबतच्या चर्चांमुळे राखीच्या आयुष्यात वेगळं वळण आलं आहे. राखी सावंत हिने नुकतेच आदिलसोबत लग्न केले होते. पण त्यानंतर दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com