
Rakhi Husband Adil Khan : पोलिसांनी रचला सापळा.. राखीचा नवरा आदिलला पोलिसांनी ठोकल्या बेड्या! काय आहे कारण
Rakhi Husband Adil Khan Arrested: राखी सावंतच्या नवऱ्याला अटक करण्यात आली आहे. आदिल राखीला राहत्या घरी भेटायला गेला. त्यादरम्यान, ओशिवरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून आदिलला अटक केली. राखीने आदिलविरोधात एफआयआर दाखल केला आहे. राखी सावंत नुकतीच मुंबईतील ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर दिसली, त्यानंतर ही घटना घडली आहे. कारण अद्याप अज्ञात असले तरी, हे राखीच्या नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधांमुळे राखीने तक्रार दाखल केली असं सांगण्यात येतंय
(rakhi sawant husband adil khan get arrested by mumbai police)
यापूर्वी राखीने पती आदिल खान दुर्रानीवर अनेक आरोप केले होते. सोमवारी मीडियाशी बोलताना राखीने आदिलवर गंभीर आरोप केले होते, राखीची आई जया भेडा यांच्या उपचारासाठी आदिलने पैसे दिले नाहीत असा आरोप राखीने केला. याशिवाय आदिलमुळेच आईचा मृत्यू झाल्याचे, असंही तिने सांगितले. राखीने असाही दावा केला की आदिलने तिला सांगितले की तो तिच्यापासून वेगळे झाला आहे आणि त्याची गर्लफ्रेंड तनुसोबत राहत आहे.
आदिलने त्याची गर्लफ्रेंड तनुसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे राखीने मीडियाला सांगितल्यानंतर काही तासांतच हा आदिलला हि अटक झाली आहे. आदिलने राखीवर अत्याचार केल्या आणि बॉलिवूडमध्ये स्टार बनण्यासाठी शिडी म्हणून राखीचा वापर केल्याचा आरोप राखीने केला. तिच्याकडे असलेले सर्व पैसे आदिलने हिसकावून घेतले, असंही राखी म्हणाली.
ओशिवरा पोलिस स्टेशननंतर राखीला आदिलसोबत मुंबईतील एका भोजनालयात दिसली. दोघांचा एकत्र डिनर करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ते एकमेकांना खाऊ घालतानाही दिसले. आणि अचानक राखीला अटक झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बिग बॉस मराठी ४ मध्ये आदिल फॅमिली वीक मध्ये राखीला भेटायला आला. दोघांमध्ये खूप वेगळं नातं दिसलं होतं. परंतु बिग बॉस मधून बाहेर आल्यावर राखीची आई आजारी होती. याशिवाय राखीचे आदिलसोबत संबंध बिघडले. हो कि नाही म्हणता म्हणता राखीने आदिलसोबत लग्न केलं.
परंतु सर्व काही नंतर ठीक होईल असं वाटत असताना राखीचे आदिलसोबत संबंध पुन्हा बिघडले. दरम्यान राखीच्या आईचं निधन झालं. आणि आता राखीच्या नवऱ्याला आदिलला अटक झाली. त्यामुळे राखी आणि आदिल मधला ड्रामा कोणतं नवीन वळण घेणार हे पुढच्या काही दिवसात बघायला मिळेल.